बांदा प्रतिनिधि :अक्षय मयेकर
दिनांक: २३ जानेवारी २०२५
श्री देव रवळनाथ जागृत देवस्थानाचा जत्रा उत्सव दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे. ही जत्रा परिसरामध्ये लोटांगण जत्रा म्हणून ओळखली जाते. या जत्रेस सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा येथून भाविक भक्तगण हजेरी लावत असतात. रात्री देवाची पालखी काढली जाते. त्याबरोबर लोटांगणही घालण्यास सुरुवात होते.
सकाळपासूनच या जत्रेत देवाचे पूजन केले जाते. त्यानंतर ओट्या भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे हे सर्व वार्षिक प्रथेप्रमाणे दिवसभरात काम केले जाते. लोटांगण घालून झाल्यानंतर रात्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर (बाबी कलिंगण )यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा. असे गावकरी, ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी कडून आव्हान करण्यात आले आहे.