आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: ५ जानेवारी २०२५

बांदा येथील कट्टा कॉर्नर सर्कल जवळ प्रकाश रिचार्ज पॉईंट श्री. उमेश येडवे यांच्या दुकानात अजगराने केले होते वास्तव्य सुमारे ७:३० दरम्यान या अजगराने हळूच  बाहेर येऊन बसलेल्या उमेश यांच्या पाठीमागच्या साईडने मानेजवळ येऊन हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता तेथील गिराईकाचा अचानक त्या अजगरावर लक्ष पडला आणि  गिराईकाच्या सावधानतेमुळे वेडा घडण्याच्या तयारीत असलेल्या अजगराच्या तावडीतून श्री उमेश येडवे बाहेर पडले.
सविस्तर माहिती अशी की प्रकाश रिचार्ज पॉइंट हे दुकान बांदा कट्टा कॉर्नर सर्कलच्या बाजूला असून त्याच्या पाठीमागच्या साईडने एक छोटासा व्हाळ जातो तिथून हा अजगर आला असल्याचा अंदाज येत आहे.तो सेलिंग मधून घुसण्याची शक्यता दर्शवली जात आहे.दुकानात घुसून सेलिंगच्या आडोशात लपून बसला होता. जवळ असलेल्या प्राणी मित्र तुषार मोरे यांनी अतिशय सावधानतेने या अजगराला पकडले आणि बांदा येथील वन विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed