
सिंधुदुर्ग संपादकीय
दिनांक: ५ जानेवारी २०२५
मडूरा गावातील मोरके वाडी येथिल विहिरीत बिबट्या पडून त्याचा दुर्देवी मृत्यु झाला.
सविस्तर महिती अशी की मोरके वाडी ही मडूरा गावातील गावाच्या नदी पलीकडे असणारी जंगल भागात गावाशी कमी संपर्कात येणारी वाडी असून जवळच जंगल असल्यानं रानटी प्राण्यांचा येथे सुळसुळाट असतो. ह्या वाडीतील विहिरीत बिबट्या पडल्याचे प्रथम दर्शनी रामदास गवंडे यांच्या निदर्शनास आले. ते विहिरीवर बसवलेला पंप चालु होत नाहीं म्हणून विहिरीवर पाहण्यासाठी गेले असता पंपाच्या वायरी तुटून विहीत पडल्याचे दिसुन आले. विहिरीत डोकावून पाहीले असता विहिरीत कुठले तरी जनावर पडल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले. त्या जनावराची पुष्टी करण्यासाठीं नेहाळून पाहीले आसत दोन दिवसापूर्वी विहीरीत पडलेला बिबट्या असावा असा त्याचा अंदाज आहे. लगेच वन विभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्याचे कर्तव्य रामदास गवंडे यांनी केले.

