आताच शेअर करा

कळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

दिनांक: ६ जानेवारी २०२५

सर्व भाविकांना तसेच नाट्य रसिकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, सालाबादप्रमाणे न्हावेली गावातील श्री देव घोडेमुख , वार्षिक जत्रौत्सव आज साजरा होत आहे. गावातील स्थानिक मोठ्या उत्साहाने, आनंदाने एकत्र येऊन हा जत्रोत्सव मोठ्या गुण्या गोविंदाने साजरा करतात.

     सकाळी ९.०० वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात होऊन नंतर केळी ठेवणे, नवस बोलणे,  आणि नवस फेडणे असे कार्यक्रम होतात.रात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा  दणदणीत असा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरीही सर्व भाविकांनी नाट्यरसिकांनी या सुसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असे न्हावेली ग्रामस्थांच्या वतीने आवाहन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *