आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर

दिनांक: ३ जानेवारी २०२५

विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय हे गौरवशाली परंपरा लाभलेली ही शाळा नसून पंचक्रोशीचे वैभव आहे. संस्था,प्रशालेचे शिक्षक,विद्यार्थी,व सर्व ग्रामस्थ यांच्यामुळे सपूर्ण पंचक्रोशीचे ,सास्कृतीक  शैक्षणिक,कला,क्रीडा अशा सर्व क्षेत्रांचे हे केंद्र आहे.  श्री छत्रपती महाराजाचा वारसा जपण्याचे काम  विलवडे ग्रामस्थांनी केला आहे. याचे सर्व श्रेय राजा शिवाजी विद्यालयास जाते असे  माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे म्हणाले. शाळेच्या विकासासाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला असून यापुढेही या शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन गावडे यांनी दिले.

        विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) संचलित राजा शिवाजी विद्यालय विलवडेच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उद्घाटनप्रसंगी संदिप गावडे बोलत होते.
     यावेळी व्यासपीठावर उपसभापती सदस्य विनायक दळवी, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, गेळे सरपंच सागर ढोकरे,संस्थेचे खजिनदार चंद्रकांत दळवी,राजेश तांबे, तांबुळी सरपंच वेदिका नाईक, कोनशी सरपंच साधना शेट्ये,सरमळे उपसरपंच दिपांकर गावडे,वाफोली सरपंच उमेश शिरोडकर,भालावल सरपंच समीर परब, उपसरपंच विनायक दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल सावंत,अनिकेत आसोलकर,सुधाकर सावंत, सोनू दळवी, प्रदीप दळवी,परेश धर्णे ,उदय परब, मोहन दळवी,सुहास बांदेकर,अरविंद कोटणीस, भिकाजी दळवी, नारायण मेस्त्री आदी उपस्थित होते.
        यावेळी राजेश तांबे यांनी या शाळेच्या सुसज्ज व प्रशस्त अशा इमारतीचे काम प्रगतीपथावर असून
विलवडेवासीयांसह दशक्रोशीतील माजी विद्यार्थी आणि दात्यानी आर्थिक पाठबळ द्यावे असे आवाहन केले.
         यावेळी विविध स्पर्धा व परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या प्रशालेतील समिक्षा गावडे,पूर्वा दळवी, गायत्री दळवी,जान्हवी नाईक,सलोनी गवस, संचिता गवस, तेजस्वी सावंत,रवींद्र दळवी,सानिका परब आदी विद्यार्थ्याना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
      रात्री उशिरापर्यंत विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, अहवाल वाचन मुकुंद कांबळे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वनसिंग पाडवी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *