आताच शेअर करा

सिंधुदुर्ग संपादकीय

दिनांक: ४ जानेवारी २०२५

ओटवणे गावचा सुपुत्र सर्जनशील युवा कलाकार रोहित सुरेश वरेकर यांने कला क्षेत्रात मोठी झेप घेतली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक कोकणी जीवनशैलीसह संस्कृती, आणि समाजातील बदल  आपल्या कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या रोहितला अवघ्या महिनाभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे पाच पुरस्कार आणि फेलोशिप प्राप्त झाल्या आहेत. या कलेतील रोहितच्या उत्तुंग यशामुळे कोकणच्या अर्थात सिंधुदुर्गच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
          रोहीत वरेकरने आजपर्यंत साकारलेल्या विविध कलाकृतीत पारंपरिक कोकणी परंपरा, संस्कृती, आणि समाजातील बदलांचे प्रतिबिंब दिसून येते. त्याच्या कलेतुन ग्रामीण कोंकणातील लुप्त होत चाललेल्या परंपरा सांस्कृतिक स्मृति आणि नागरीकरणामुळे होणारे बदल प्रभाविपणे पहायला मिळतात. रोहितचा कलात्मक दृष्टीकोन कोकणातील पारंपरिक मुळांमध्ये दडलेलाआहे. लाकडाच्या खेळण्यांची परंपरा, मातीची घरे, आणि ग्रामीण जीवनशैलीतील साधेपणाचा प्रभाव त्यांच्या कलेतून स्पष्टपणे जाणवतो. तो जुन्या स्मृतींना जिवंत ठेवत काळाबरोबर हरवलेल्या परंपरांचे पुनरुज्जीवन करतात. त्यांची कला ही कालबाह्य होत चाललेल्या गोष्टींना एक नवा अर्थ देण्याचा प्रयत्न आहे.
       रोहित आपल्या कलेत पारंपरिक नैसर्गिक संसाधनांपासून गळून पडणाऱ्या मातीच्या घरांपासून ते लाकडी खेळण्यांपर्यंत आणि  पर्यावरणपूरक कलाकृती, कोकणातील संस्कृती, परंपरा नव्याने उभ्या करताना सध्या होणारे नागरीकरणाचे परिणाम त्याच ताकदीने मांडतो. त्यामुळे त्याची कला ही फक्त रंगरेषांपुरती मर्यादित नाही, तर ती समाजाच्या अंतःकरणाशी संवाद साधते.


चौकट आणि फोटो रोहित वरेकर

“कला म्हणजे केवळ सृजनशीलता नव्हे, तर समाजाशी साधला जाणारा संवाद आहे. “कला ही सौंदर्याची निर्मिती नसून समाजातील बदल टिपण्याचे साधन आहे,” माझ्या कलेचा उद्देश फक्त कलाकृती निर्माण करणे नसून, समाजाला विचार करण्यास प्रवृत्त करणे आहे,”कला ही फक्त प्रदर्शनापूर्ती नाही, तर समाजाच्या काळजाला भिडणारा आरसा आहे. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि नागरीकरणामुळे होणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांवर कलात्मक चर्चा घडवणे आवश्यक असून मातीची घरे, लाकडी वस्तू, आणि पारंपरिक वस्तु केवळ सामग्री नाहीत; ती जीवनशैलीची, स्मृतींची, आणि पारंपरिक विचारांची प्रतीके असुन त्यांच्यात समाजाचा  जिवंत इतिहास आहे. आणि त्या मूल्यांना जिवंत ठेवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

दिल्लीतील नव्या इमर्जिंग आर्ट ग्रँटसाठी निवड
     
दिल्लीतील गॅलरी नव्यातर्फे देण्यात येणाऱ्या नव्या इमर्जिंग आर्ट ग्रँट 2024′ या प्रतिष्ठित अनुदानासाठी भारतातील अनेक उदयोन्मुख कलाकारांमधून रोहित याची निवड करण्यात आली आहे. यासाठी देशभरातून शेकडो कलाकारांच्या  अर्जांमधील प्रकल्पांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. त्यांनतर अंतिम फेरीत कलाकारांनी आपली कलाकृती प्रत्यक्ष सादर केली. चार टप्प्यांच्या कठीण प्रक्रियेनंतर ज्युरींनी रोहितच्या सर्जनशील दृष्टिकोनाला दाद देत रोहितची निवड केली. या प्रसिद्ध नामांकित ज्युरींमध्ये रणबीर कलेका, जी. आर. इराणा, क्यूरेटर क्रिस्टीन मायकेल, इंडिया आर्ट फेअरच्या संचालिका जया असोकन यांचा समावेश होता. ही निवड दिल्लीच्या कलाक्षेत्रात मोठ्या अभिमानाची बाब असुन  दिल्लीच्या प्रगत कला वर्तुळात रोहित याची कला चर्चेचा विषय ठरली आहे. हि ग्रांट मिळाल्यामुळे रोहित यांच्या कलेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. या ग्रांटमध्ये आर्थिक पाठबळासोबतच, राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी, गॅलरीमध्ये प्रदर्शने सादर करण्याची संधी आणि ज्युरींच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. पारंपरिक लाकडी खेळणी आणि सांस्कृतिक स्मृतींवर आधारित त्यांची कलाकृती सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते, जो नागरीकरणाच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुंबईतील Immerse फेलोशिपसाठी निवड

मुंबईत लवकरच होणाऱ्या ‘मुंबई गॅलरी विकेंड 2025’ साठी आणि नंतर एप्रिल-मे 2025 दरम्यान होणाऱ्या कलाकारांच्या विशेष फेलोशिप साठीही रोहितची निवड करण्यात आली आहे. कला क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या फेलोशिप निवडलेल्या कलाकारांना देश-विदेशातील कलाकार, कलेक्टर, आणि नेटवर्किंग करण्याची संधी मिळते. या फेलोशिपमधून रोहित मुंबईतील नागरीकरणाचे परिणाम आणि सांस्कृतिक स्मृतीवर आधारित प्रकल्प विकसित करणार असुन शहरीकरणाच्या कचाट्यात हरवलेल्या सांस्कृतिक स्मृतींवर अधिक सखोल काम करण्याची संधी त्यांला मिळणार आहे.

आर्ट *ऐचोल* *स्कल्पचर* फेलोशिप
Art Ichol Sculpture Fellowship

रोहितची मध्यप्रदेशातील मैहर येथे होणाऱ्या एक महिन्याच्या निवासी कला कार्यक्रमासाठी  निवड झाली असुन तेथे तो माती, लाकूड, आणि शिल्पकलेचा वापर करून सांस्कृतिक स्मृतींना मूर्त रूप देणार आहेत. तसेच पारंपरिक आणि नैसर्गिक सामग्रींचा उपयोग करून शिल्पकलेच्या माध्यमातून सामाजिक विचार मांडणार आहेत. ग्रामीण आणि नागरी जीवनशैलीतील तफावत दाखवणारा हा प्रकल्प आहे. मातीच्या घरांच्या भिंतींवरून काळाचा प्रवास समजतो. या स्मृतींना कलेच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न रोहित करणार आहे.

आर्ट फॉर होप हुंडाई आर्ट ग्रँट साठी निवड

हुंडाई मोटर्स च्या आर्ट फॉर होप हुंडाई आर्ट ग्रँट २०२५ साठी ५० आर्टीससह रोहितची अग्रक्रमाने निवड करण्यात आली. यासाठी देशभरातून ५२१ डिजिटल, कार्यात्मक, कार्यप्रदर्शन, पारंपारिक, व्हिज्युअल आणि बहुविद्याशाखीय थीमसह कला प्रकारांच्या विस्तृत स्पेक्ट्रमचे प्रतिनिधित्व कलाकार आणि कला संग्रहातील आर्टीसनी अर्ज केले होते. भारतातील सर्वोत्तम सर्जनशील प्रकल्प निवडण्यासाठी कलात्मक दृष्टिकोन, सामाजिक संदर्भ, आणि प्रकल्पाचा परिणाम या निकषांवर ज्युरींनी रोहितची निवड केली. हुंडाई मोटर इंडिया फाउंडेशनद्वारे देण्यात येणारा हा प्रतिष्ठित ग्रांट आहे. या ग्रांटद्वारे रोहित सांस्कृतिक स्मृतींवर आधारित एक भव्य प्रकल्प साकारणार आहे. त्यामुळे रोहितला आपली कला पुढे नेण्याची मोठी संधी मिळाली आहे.

फेअरवेल *टू* मेमरी
लक्षवेधी कलाकृती
*bengal biennale 2024*

रोहित वरेकर यांने बंगाल बिएनाले 2024 मध्ये *साकारलेली* “फेअरवेल ऑफ मेमरी” या कलाकृतीचा प्रकल्प लक्षवेधी ठरला. ही कलाकृती फक्त एक कला म्हणून नव्हे, तर एक अनुभव म्हणून उभी आहे. जी हरवलेल्या स्मृतींशी संवाद साधते आणि आधुनिक काळाच्या प्रवाहात हरवत चाललेल्या परंपरांचे दस्तऐवजीकरण करते. ही कलाकृती पारंपरिक मातीच्या भिंती, लाकडाचा पोत, आणि रंगीत मेणाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. भिंतींवरून खाली झरणाऱ्या रंगीबेरंगी मेणाच्या ओळी आधुनिक काळाच्या प्रवाहात हरवत चाललेल्या परंपरांचे प्रतीक आहेत. ही कलाकृती केवळ एक भूतकाळाला अलविदा नसून सांस्कृतिक वारशाला पुन्हा जिवंत करण्याचा एक संवाद आहे. जी हरवलेल्या स्मृतींना सन्मान देत नव्या युगाला सामोरे जाण्याची प्रेरणा देते. रोहितचे हे सादरीकरण प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या सांस्कृतिक स्मृतींशी जोडणारे ठरले. बंगाल बिनालेच्या व्यापक मंचावर त्याने पारंपरिक आणि आधुनिक जीवनशैली यामधील ताणतणाव प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे या कलाकृतीने प्रेक्षकांसह कलासमीक्षकांची विशेष दाद मिळवली. म्हणूनच या कलाकृतीचे सादरीकरण पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय नामांकित कलाकारांनी भेट देत  रोहितच्या कलेचे कौतुक केले. त्यामुळे रोहितचा कलात्मक प्रवास अधिक  उंचीचा ठरला आहे. आधुनिक शहरीकरणाच्या वेगवान प्रवाहात ज्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक गोष्टी मागे पडल्या आहेत, त्यांची आठवण करून देणारी ही कलाकृती आहे.
         रोहितची कला केवळ प्रदर्शनापुरती मर्यादित न राहता ती गावकऱ्यांशी थेट संवाद साधत आहे. येत्या जानेवारी महिन्यांत रोहित विविध फेलोशिप सोबत आणि प्रकल्पांवर काम करताना दिसणार आहे. त्यात कोकणची ओळख जागतिक स्तरावर नेण्याचा तो प्रयत्न करणार आहे. त्याच्या कलेमुळे कोकणची संस्कृती, परंपरा, आणि मातीतील स्मृती नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत.
         रोहितने मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून बॅचलर *ऑफ फाइन आर्ट *केल्यानंतर अलीकडेच पश्चिम बंगाल येथील विश्व भारती *विद्यापीठ* शांतिनिकेतन कलाभवन मधील  शिल्पकला विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. रोहित वरेकर याने चार महिन्यापूर्वी बहुचर्चित बारदोवी या चित्त थरारक चित्रपटातील कलाकारांच्या पार्श्वभूमीस अनुरूप वातावरण निर्मितीसाठी सेट डिझाईन करताना आपले कौशल्य पणास लावले होते. दिल्ली येथे दर वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात गोवा राज्याचा  चित्ररथ चित्ररथांचे निर्माते सुशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारताना युवा आर्टिस्ट रोहित वरेकर आणि त्याचे वडील मास्टर ऑफ क्राफ्टमन सुरेश वरेकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. अशा अनेक कलाकृती रोहित वरेकर यांने साकारत राष्ट्रीय पातळीवर सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *