
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक २६ डिसेंबर २०२४
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त २ दिवस भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दिनांक २७ रोजी सकाळी १० वाजता मा. नामदार नितेशजी राणे, श्रीमंत खेमसावंत भोसले, श्री प्रताप मूर्ती, बांदा सरपंच प्रियांका नाईक संस्थाध्यक्षा कल्पना ताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलींद तोरसकर, खजिनदार वैभव नाईक, सदस्य जितेंद्र गावडे , प्रवीण नाईक समन्वय समिती सचिव सौ रश्मी तोरसकर उद्योजक प्रसाद पावसकर, सुशांत पांगम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होईल. त्यानंतर फॅशन परेड व आदर्श व्यक्तिमत्व स्पर्धा होईल. तसेच दोन्ही दिवस सायंकाळी ६ ते १०.३० पर्यंत माध्यमिक, उच्च माध्यमिक व इंग्लिश मीडियम स्कूल चे विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील. तरी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री नंदकिशोर नाईक व सहकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.



