
सिंधुदूर्ग संपादकीय
दिनांक: २६ डिसेंबर २०२४
आज न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सिंधुदुर्गातील जेष्ठ साहित्यिक तथा नामवंत कवी, स्तंभ लेखक श्री अजय कांडर भूषविणार आहेत. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई गेली अनेक वर्षे सातत्याने आपल्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साहित्य वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी या साठी खास विद्यार्थ्यांसाठी कुमार साहित्य संमेलन आयोजित करीत आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना साहित्यिकांना अनुभवता येते. अजय कांडर यांच्या सोबत मालवण येथील निबंध आणि कथाकार नागेश कदम. साहित्यिक रामचंद्र शिरोडकर, मनोहर परब, युवराज सावंत आदि सिंधुदूर्ग साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी विद्यार्थी साहित्यिक सुध्दा स्वरचित कविता सादर करून वाहवा मिळवतात. या वर्षी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे यजमानपद न्यू इंग्लिश स्कूल भेडशी या शाळेला मिळाले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ग्रंथ दिंडी व शोभा यात्रेने होईल. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचचे कार्याध्यक्ष श्री मिलिंदजी तोरसकर तसेच संस्था कार्यकारिणी सदस्य आणि भेडशी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री एन.एन. नाईक यांनी केले आहे.



