आताच शेअर करा

सिंधुदूर्ग संपादकीय

दिनांक: २३ डिसेंबर २०२४

माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधूरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्य मंडळ यांना वाहन खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान शासनाकडून मंजूर करण्यात आले होते. उर्वरित २५% रक्कम कर्ज जिल्हा बँकेकडून देण्यात आले होते. अनुदान मिळेपर्यंत संपूर्ण कर्ज रक्कम बँकेने विनातारण १५ नाट्य मंडळांना मंजूर केली होती. त्यापैकी ९ वाहने जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत करण्यात आली आहेत.या ९ दशावतार नाट्य मंडळाच्या मालकांकडे वाहनाच्या चाव्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते जिल्हा बँकेच्या प्रदान कार्यालयामध्ये सिंधुदुर्ग नगरी येथे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, प्रकाश बोडस, रवींद्र मडगावकर, महेश सारंग, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, सिंधूरत्नचे डॉ.आनंद तेंडुलकर, जिल्हा परिषद अधिकारी महादेव शिंगाडे, भालचंद्र माळवदे, बँकेचे अधिकारी व कर्मचारी आणि दशावतार नाट्य मंडळाचे मालक व कलाकार उपस्थित होते.
जिल्हा बँकेने केलेल्या सहकार्यामुळे नाट्यमंडळांना नवीन वाहने उपलब्ध होऊ शकली याबद्दल नाट्यमंडळांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे तसेच अनुदान दिल्याबद्दल माझी मंत्री दीपक केसरकर व शासनाचे आभार मानले.
यावेळी वालावलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ,  चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, आजगावकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ, मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट्य मंडळ, आणि खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ या दशावतार नाट्य मंडळांना वाहने सुपूर्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *