बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर
दिनांक: २३ डिसेंबर २०२४
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे शानदार सोहळ्याने उद्घाटन.
दोन दिवस चालणाऱ्या आणि धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या शिक्षण संस्थेच्या सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यातील एकूण नऊ शाळांच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज शानदार सोहळ्याने करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री मनीष दळवी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान धी बांदा नवभारत शिक्षण मंडळ प्रसारक मंडळ मुंबई चे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी भूषविले.
दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदाच्या भव्य पटांगणावर विविध मैदानी वैयक्तिक आणि सांघिक क्रीडाप्रकारात शाळांचे विद्यार्थी आपले नैपुण्य दाखवणार आहेत. क्रीडा महोत्सवाची सुरूवात एन सी सी बटालियनच्या शानदार परेड आणि खेळाडूंच्या चमूने केलेल्या ध्वज संचालनाने झाली. क्रीडा ध्वज फडकवला गेला. दिप प्रज्वलन झाले आणि क्रीडा ज्योत मैदानात फिरवण्यात आली. बांदा हायस्कूलच्या मुलांनी रंगारंग कार्यक्रम सदर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आपल्या भाषणात मनिष दळवी यांनी शालेय जीवनात खेळ महत्वाचा असून जीवनाची स्पर्धा जिंकायला मैदानातील खेळ तुमचे सहाय्य करतील. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे ग्रामीण भागातील कार्य हे उल्लेखनीय आहे. संस्था आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम पाठीशी राहिन असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी व्यासपिठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. कल्पनाताई तोरसकर, खजिनदार श्री वैभव नाईक, समन्वय समिती सचिव सौ रश्मी तोरसकर,सहसचिव नंदकुमार नाईक, सिंधुदूर्ग जिल्हा बँक बांदा चे शाखाधिकारी तसेच रोटरी क्लब बांदा चे अध्याक्ष सीताराम गावडे, बांदा सरपंच प्रियांका नाईक, अभय देसाई, बबन गवस, अन्वर खान, भिकाजी धुरी, सावंत, आदी समन्वय समिती चे सदस्य , सर्व शाळांचे मुख्याध्यपक, शालेय समिती सदस्य, पालक उपस्थित होते. यावेळी माहीम चे आमदार श्री महेश सावंत यांनी या क्रीडा महोत्सवास भेट देऊन शूभेच्छा दिल्या.