बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर
दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काल सकाळी निगुडे गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमधील २१६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झालेली असताना अचानक ईव्हीएम मध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. सुमारे २० मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती. बिघाड दूर केल्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. मशीनचे बटण प्रेस होऊन राहिल्याने मतदान बंद राहिल्याचे केंद्राध्यक्ष के. बी. गुळाटी यांनी सांगितले.
निगुडे येथे ईव्हीएम मशीन बिघाडानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. त्यावेळी मतदारांनी गर्दी केली होती. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
