मुंबई:संपादकीय
दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२४
देशाच्या सीमेवरील एक इंच ही जमीन शत्रूंना बळकावू देणार नाही. याबाबत सरकार कोणती तडजोड करणार नाही. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेजारील देशांना ठणकावले. गुजरातच्या कच जिल्ह्यात सीमेवरील जवानासोबत पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
२०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान पद स्वीकारल्या नंतर मोदी दरवर्षी सीमेवरील जवानासोबत दिवाळी साजरी करतात या उपक्रमात यंदा भारत व पाकिस्तानच्या सीमेवरील सर क्रिकची निवड करण्यात आली होती. आपल्या देशाचा भूतकाळ पाहिला तर राजनैतिक चर्चेच्या क्षेत्राचे युद्धभूमी रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शत्रूच्या या कारवाई विरोधात आवाज उठवला होता. या सीमेवर शत्रूंचा दीर्घकाळ डोळा होता परंतु डोळ्यात तेल घालून तुम्ही या सीमेचे रक्षण करत असल्याने आपले देशवासीय निश्चिंत आहेत .तुमच्या या सामर्थ्याची शत्रूलाही जाणीव आहे असे ते जवानांना उद्देशून म्हणाले.
Nदेशातील नागरिक आज सीमेवरील असलेल्या जवानामुळेच सुरक्षित आहे.जग तुमच्याकडे पाहते तेव्हा त्यांना आपल्या देशाची ताकद लक्षात येते असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करत असताना म्हणाले.
*दिवाळीत बनावट मिठाईपासून सावध रहा…..*
देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. या निमित्ताने पूजेबरोबरच घर सजवण्याची आणि एकमेकांचे तोंड गोड करण्याची प्रथा खूप जुनी आहे.
दिवाळीचे आगमन होताच बाजारपेठेत मिठाईची दुकाने सजतात. मात्र अशा परिस्थितीत बनावट आणि भेसळयुक्त मिठाईही मुबलक प्रमाणात विकली जाऊ लागली आहे. भेसळयुक्त मिठाईमुळे शरीरासाठी घातक आहे.
सण उत्सव प्रसंगी जेव्हा मिठाईची मागणी वाढते तेव्हा बनावट मिठाईचा वापर करून नफा मिळविण्यासाठी बनावट आणि रासायनिक रंगाच्या मिठाई बाजारात विकतात ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
*बनावट मिठाई मिठाईचे दुष्परिणाम शरीराला कसे हानी पोहोचवू शकतात जाणून घ्या…*
बनावट मिठाई बनवण्यासाठी फसवणूक करणारे खवा आणि दुधाऐवजी बटाटा, आयोडीन, डिटर्जंट, सिंथेटिक दूध, व्हाईटनर, खडू, युरिया आणि इतर प्रकारची रसायने वापरतात.
इतकंच नाही तर मिठाई सजवण्यासाठी सिल्व्हर वर्क ऐवजी अल्युमिनियम वर्कचा वापर केला जात आहे, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
मिठाईमध्ये रंगाच्या नावाखाली रसायन मिसळणे, बनावट मावा, नकली दूध, यांचा वापर केला जातो. आणि आपण जर अशा प्रकारची मिठाई खात असाल तर यामुळे अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात.
बनावट मिठाईच्या सेवनामुळे मेंदूचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार आणि अनेक प्रकारच्या अलर्जी होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अनेक ठिकाणी मिठाईत भेसळ करताना त्यात स्टार्च आणि अनसॅच्युरेटेड फॅट सारख्या गोष्टी मिसळल्या जातात, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो
मिठाईवरील अल्युमिनिअमचे पोटात जाऊन मेंदू आणि हाडांना मोठी हानी पोहोचवते. याच्या सेवनाने मुलांच्या किडनीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.
*कुमार चोप्रा,
*सुनील इनामदार, संग्रहक
🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹
*(कॉपी पेस्ट)*
*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9819957223/8369539769 ह्या नंबर वर Join Me असा what’s up मेसेज करा*
*किंवा लिंकला टच करा व join व्हा👇*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*