बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
दिनांक:३१ ऑक्टोंबर २०२४
बांदा येथे आमचीवाडी देऊळवाडी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेत माजगाव दळवीवाडी संघ विजयी ठरला. या मंडळाने भव्य दिव्य नरकासुर प्रतिमा साकारली होती. तसेच एस के बॉइज बांदा यांना द्वितीय व देऊळवाडी बॉइज यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही मंडळाने उत्कृष्ट नरकासुर वध देखावे सादर केले. तसेच गोवा येथील माऊली स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब पेडणे या निमंत्रित मंडळाने अवाढव्य नरकासुर व श्रीकृष्ण र रथ दाखवून लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या स्पर्धेत एकूण १५ नरकासुर सहभागी झाले. विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.