आताच शेअर करा
असनिये गावचा “आदर्श गाव” पुरस्कर स्वीकारताना

सिंधुदूर्ग : संपादकीय

दिनांक:१ नोहेंबर २०२४

मुंबई येथे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त “कोकण कला महोत्सव” या कार्यक्रमात असनिये गावाला “आदर्श गाव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार पद्मश्री राहीबाई पोपेरे, हिरवळ ग्रुपचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. रेणुताई दांडेकर, हास्य जत्रा फेम अभिनेते ओंकार भोजने, आवाजाचे जादूगार आणि मराठी सिनेश्रुष्टीतील दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सिंधुदुर्ग बॅंकचे उपाध्यक्ष दिनकर तावडे, संस्थेचे ट्रस्टी योगेश भोसले आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, जैवविविधतेने नटलेल्या व तब्बल ८५ हून अधिक नैसर्गिक पाण्याचे बारमाही स्रोत असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील हे असनिये गाव. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्राम पुरस्कारांसाठी नामांकन झालेल्या गावांतून असनियेने सर्व पातळींवर अव्वल क्रमांक प्राप्त केला. सरपंच व ग्रामसेवकांना रोख २५ हजार रुपये, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रामपुरस्कारासाठी संस्थेने ऑनलाईन अर्ज मागविले होते. तिन्ही जिल्ह्यांतून ५० हून अधिक ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. गावात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय लोकोपयोगी योजना, आरोग्य, शैक्षणिक उपक्रम, गावातील प्रमुख पिके, शेती व्यवसाय, महिला बचतगट व सक्षमीकरणसाठी राबविण्यात येणारे उपक्रम यावर आधारित निकष ठेवले होते. असनियेत देवराई संवर्धन, धनेश (हॉर्नबिल) पक्षाला संरक्षण तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्यास मिळतात. वन्यप्राण्यांनी येथील जंगलसंपदा समृद्ध आहे. गावात एकही विहीर नसून, या गावाला बिनविहिरीचे गाव म्हणून देखील संबोधण्यात येते. गावात मद्यपानास बंदी असून, दारुबंदी पाळणारे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच गाव आहे. या सर्व निकषांवर असनिये गावाने प्रभावी कामगिरी केल्याने आदर्श गाव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात कोकण रत्न पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी ‘रील टू रियल’ पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘झिरो टू हिरो’ पुरस्कार, तसेच युवा उद्योजकांसाठी ‘युथ आयकॉन’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात युवा गायकांनी आपल्या भावगीत गायनाने मैफिल अधिक रंगतदार बनवली.

५०० + कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ओवळे आणि संजना पाटील यांनी केले. कॉन्टेन्ट क्रिएटर गौरी पवार, अजित दळवी सर, सुनील करडे, गणेश नाईक, तसेच संस्थेचे व्यवस्थापक आणि संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संपर्क 8369539769/9819957223

दिवाळीत बनावट मिठाईपासून सावध रहा…..

देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. या निमित्ताने पूजेबरोबरच घर सजवण्याची आणि एकमेकांचे तोंड गोड करण्याची प्रथा खूप जुनी आहे.

दिवाळीचे आगमन होताच बाजारपेठेत मिठाईची दुकाने सजतात. मात्र अशा परिस्थितीत बनावट आणि भेसळयुक्त मिठाईही मुबलक प्रमाणात विकली जाऊ लागली आहे. भेसळयुक्त मिठाईमुळे शरीरासाठी घातक आहे.

सण उत्सव प्रसंगी जेव्हा मिठाईची मागणी वाढते तेव्हा बनावट मिठाईचा वापर करून नफा मिळविण्यासाठी बनावट आणि रासायनिक रंगाच्या मिठाई बाजारात विकतात ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

बनावट मिठाई मिठाईचे दुष्परिणाम शरीराला कसे हानी पोहोचवू शकतात जाणून घ्या…
बनावट मिठाई बनवण्यासाठी फसवणूक करणारे खवा आणि दुधाऐवजी बटाटा, आयोडीन, डिटर्जंट, सिंथेटिक दूध, व्हाईटनर, खडू, युरिया आणि इतर प्रकारची रसायने वापरतात.

इतकंच नाही तर मिठाई सजवण्यासाठी सिल्व्हर वर्क ऐवजी अल्युमिनियम वर्कचा वापर केला जात आहे, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

मिठाईमध्ये रंगाच्या नावाखाली रसायन मिसळणे, बनावट मावा, नकली दूध, यांचा वापर केला जातो. आणि आपण जर अशा प्रकारची मिठाई खात असाल तर यामुळे अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात.

बनावट मिठाईच्या सेवनामुळे मेंदूचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार आणि अनेक प्रकारच्या अलर्जी होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी मिठाईत भेसळ करताना त्यात स्टार्च आणि अनसॅच्युरेटेड फॅट सारख्या गोष्टी मिसळल्या जातात, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी खूप वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

मिठाईवरील अल्युमिनिअमचे पोटात जाऊन मेंदू आणि हाडांना मोठी हानी पोहोचवते. याच्या सेवनाने मुलांच्या किडनीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.

*कुमार चोप्रा,
*सुनील इनामदार, संग्रहक

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

(कॉपी पेस्ट)
आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂
join होण्यासाठी 9819957223/8369539769 ह्या नंबर वर Join Me असा what’s up मेसेज करा
किंवा लिंकला टच करा व join व्हा👇
https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *