(गोवा) पेडणे: प्रतिनिधि
दिनांक:३० ऑक्टोंबर २०२४
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार गोव्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप म्हामल यांना देऊन गौरविण्यात आले.
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार सोहळा वितरण बेळगाव येथे दिनाक:२७ ऑक्टोंबर २०२४ रोजी पार पडला. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांतर्गत पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, व गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. गोवा राज्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. दिलीप म्हामल यांना आपल्या शिक्षकी पेशात काम करत असताना सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून गोवा राज्याचे नाव उंचावून प्रगतीपथावर नेल्याबद्दल भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मटाधीश यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, कायमस्वरूपी चंदनाचा हार व अभिनंदन पत्र भारत सरकारचे मा. केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये मान्यवर मा. श्री. वीरप्पा मोइली(केंद्रीय कायदामंत्री भारत सरकार दिल्ली मा. मुख्यमंत्री कर्नाटक सरकार) डॉ.सीमा इंगळे (फाउंडेशन चेअरमन उद्योगपती मलेशिया राष्ट्र) बॅरिस्टर श्री. अमरसिंह पाटील (मा. खासदार बेळगाव) मा. श्री. जयराज लोंढे (विशेष अभियंता राज्य दिल्ली) श्री. राजू शिंगाडे (मा. महापौर कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य) एलिझाबेथ इस्लाम लिऑन( सी. ई. ओ. उद्योगपती इजिप्त राष्ट्र ) श्रीमती रत्नमाला साबनुर (मा.केंद्रीय मंत्री भारत सरकार दिल्ली) श्री. अरविंद पट्टी (मा.जिल्हा कमांडर होमगार्ड डिपार्टमेंट कर्नाटक सरकार) श्री. महेश सेयण्णावर (जिल्हा पोलीस प्रमुख ( अतिरिक्त )एस. पी. बिदर कर्नाटक सरकार) या मान्यवरांच्या उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.दिलीप म्हामल हे सरकारी प्राथमिक विद्यालय आगरवाडा पेडणे (गोवा)येथे कार्यरत असून हया पुरस्कारामुळे शिक्षकी पेशात, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक व मित्रपरिवारात त्यांचें सर्व स्तरातून कौतुक होत आहे.