सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर
दिनांक :२३ सप्टेंबर २०२४
वर्ल्ड स्टीम रोबोटिक ओलंपियाड (WSRO) नॅशनल आणि इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२४ कॉम्पिटिशन गुजरात राज्य आमदाबाद येथे घेण्यात आले होते.
लाईन फॉलोविंग स्पर्धेत गोव्यातील देवसु कोरगाव येथील प्रज्ञा हायस्कूलचे विद्यार्थी कु.मयंक संदीप कवठणकर आणि दिलराज दिलीप कवठणकर यांनी वर्ल्ड स्टीम आणि रोबोटिक ओलंपियाड आयोजित रेषेखालील स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. हा विजय गोव्यासाठी विशेष उल्लेखनीय होता. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मणिपाल विद्यापीठ जयपूरच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मागे टाकले. त्यामूळे १४ व १५ सप्टेंबर २०२४ या जोडीने देशातील ३१ सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध लाईन फोलॉइंग रोबोट स्पर्धेत लढत देऊन अहमदाबाद गुजरात येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कौशल्य आणि ज्ञान प्रदर्शित केलेत्यात त्यांना प्रशसनीय सातवे स्थान मिळविले. या खेळात शाळेचे शिक्षक श्री. प्रसाद गडेकर यांचे मोठे मार्गदर्शन लाभले हया यशा मागे त्यांचा मोठा वाटा आहे.योग्य प्रशिक्षण आणि तल्लभ बुद्धीच्या जोरावर योग्य मुलांची निवड केल्यामुळे मुलांना यश मिळाले.चुरशीची लढत – लढत असताना मयंक आणि दीलरज कवठणकर यांच्या समोर देशातील व परदेशातील ३५० बलाढ्य टीम चे आव्हान होते. त्यात त्यांनी ३१ टीमशी सामना करून आपल्या बुद्धीच्या जोरावर दोघांनी मिळून अवघ्या १९ सेकांदामध्ये आपले प्रात्यक्षिक दाखवून घवघवीत यश मिळविले लाईन फॉलोविंग रोबोट प्रोग्रामर म्हणून स्पर्धेत मयंक याने आपल्या टीम साठी काम पाहिले. तर दिलराज याने कॅप्टन ची भूमिका निभावली.
हा विजय मिळवत असतानाच मयंक यांचे वडील म्हणाले की ह्या पाठीमागे खंबीरपणे महाराष्ट्र भाजपचे युवा नेते भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे सहकार्य लाभले. वेळोवेळी आर्थिक आणि मानसिक सहकार्य देऊन स्पर्धे पर्यंत पोहोचवण्याचं काम परब यांनी केले आहे. विशाल परब यांचे वेळोवेळी मयंक आणि दीलराज यांना मार्गदर्शन असते. सिंधुदुर्गाच्या सीमेवरील सातार्डा येथे राहणारे आणि गोव्यात देवसू येथे प्रज्ञा हायस्कूलमध्ये शिकणारे कु.मयंक आणि दीलराज यांनी आज आपल्या जिल्ह्याचे आणि गोवा राज्याचे नाव उंचावलेले आहे. असेही मयंक यांचे वडील म्हणाले.