आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर

प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही आमचीवाडी देऊळवाडी यांच्या माध्यमातून नरक चतुर्थी निमीत्त भव्य सिंधुदुर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा बांदा येथे दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८:०० ते ११ या वेळेत  आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १११११ , द्वितीय पारितोषिक ७७७७ व तृतीय पारितोषिक २२२२ रूपये एवढे ठेवण्यात आले आहे.हया  वर्षी  आचारसंहिता असल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून वेळेचे बंधन घालण्यात आले आहे.त्यामुळे स्पर्धेला वेळेचे बंधन आहे. ही स्पर्धा पिंपळेश्र्वर मंदिर या ठिकाणी होणार असून  सर्वानी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी  व प्रतिनिधि यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत आपली नाव नोंदणी खालील  नंबर वर फोन करून नोंदवावी. आशिष सावंत (7058322706) गौरांक साळगावकर (7058559216) देवेश वारंग (7057568486) या नंबर वर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

संपर्क 8369539769/9819957223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *