आताच शेअर करा

पेडणे प्रतिनिधि

दिनांक: १४ ऑक्टोंबर २०२४

प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या कला शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वीचा काळ इतिहास जमा झाला. आज घरोघरी गावागावात वेगवेगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका शिक्षक उपलब्ध आहेत. जर आपणास गावागावात आपल्या घरात जवळही जर नृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका उपलब्ध असतील, तर त्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन कलाकारांनी आपलं नाव उज्वल करावं. असे प्रतिपादन एडवोकेट सिद्धी जीत आरोलकर यांनी मोरर्जी पंचायत सभागृहामध्ये मोरर्जी येथील नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स च्या शेकडो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने त्या बोलत होत्या.
दसरो उत्सवाच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर मोरजी सरपंच पवन मोरजे, माजी सरपंच तथा विद्यमान पंच मुकेश उर्फ उमेश गडेकर योगा प्रशिक्षक अंकिता म्हामाल कृषी अधिकारी उमा जोशी नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी, श्री परब आदी उपस्थित होते.
नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स मार्फत मोरजी पेडणे, शिवोली म्हापसा या ठिकाणी भरत नाट्यम चे वर्ग प्रशिक्षण केंद्र सुरू झालेली आहे. या तिन्ही वर्गामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शवला. त्या शेकडो प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा करण्यात आला. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नटेश्वराची आराधना आणि घुंगरू यांचं पूजन विधिवत करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या एडवोकेट सिद्धी जीत आरोलकर यांनी पुढे बोलताना सांगितले की पूर्वी काही जे शिक्षक नृत्याचे म्हणा किंवा इतर प्रशिक्षण देणारी तज्ञ आहेत, त्या तज्ञांनी शहराकडेच आपला मोर्चा वळवला होता. परंतु वैष्णवी जोशी हिने मात्र शहराकडे धाव न घेता सुरुवातीपासून आपल्या गावाकडली नाळ घट्ट पकडत ग्रामीण भागात आणि आपल्या गावात कलाकारांच्या घराघरात जाऊन प्रशिक्षण देण्याचं काम तिने केलं. याही पुढे तिने उल्लेखनीय कार्य करावं . मांद्रे उदरगत संस्था सदोदित त्यांना सहकार्य करेल,अशी आश्वासन यावेळी एडवोकेट सिद्धी जीत आरोलकर हिने दिले.

कुमारी मानसी शिरोडकर, दिपाली परब ,जीविका बगळी,
आरल मोरजे, , स्वरा म्हामल,तेजल वेरणेकर, व सौरव पोके ह्यांनी पुष्प देऊन स्वागत केले.
आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मोरजी सरपंच पवन मोरजे यांनी बोलताना यावेळी नृत्य शिक्षिका वैष्णवी जोशी हिने गावातील अनेक कलाकारांना नृत्य प्रशिक्षण देऊन त्यांचं नाव उज्वल करण्याबरोबरच गावातही नाव उज्वल केले आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत असताना उच्च दर्जापर्यंत प्रशिक्षण घेऊन जे गुरुजन आपल्याला सांगतात त्यांचं मार्गदर्शन घेत असताना आपली कला जगप्रसिद्ध करावी असे आवाहन करत वैष्णवी जोशी यांनी मुलांना प्रशिक्षण देऊन एक चांगलं कार्य केल्याचे ते म्हणाले.

  माजी सरपंच मुकेश गडेकर यांनी बोलताना सांगितले की मोरजी गावातील एक नृत्य शिक्षिकेने शेकडो विद्यार्थ्यांना तयार करून त्यांची कला गावात गावाबाहेर राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे जे उल्लेखनीय कार्य केले. त्याला मोरर्जी पंचायत मंडळ सदोदित सहकार्य करत असल्याचे ते म्हणाले.

विशेष गौरव पत्रकार निवृत्ती शिरोडकर, योग शिक्षिका अंकिता म्हामल व अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय परीक्षेत सर्वोच्च  गुण मिळविलेल्या तपस्या म्हापसेकर हिचा करण्यात आला
यावेळी  अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय  परिक्षेत उत्तम यश प्राप्त पुढील विद्यार्थांचा पालकांच्या समवेत सन्मान करण्यात आला.
प्रारंभीक-पहिल्या  वर्षी
श्रेणीत तपस्या म्हापसेकर , आद्या फ़डते, अनिशा गावडे, ,अदिती कोरगावकर, सानवी राऊत, साची राऊत,

प्रथम श्रेणी-मानसी शिरोडकर, आरल मोरजे, पूर्वी शेटगावकर ,दिव्या ढोणे, आध्या मोरजे, त्विषा शेटगावकर आर्वी शेटगावकर,साची हरमलकर,आशी मोरजे,करिष्मा शेटगावकर,मृणाल शेटगावकर,रुषम मोरजकर,श्रुष्टी अशवेकर, हर्षली हलर्णकर, निशा शिरोडकर

प्रवेशिका प्रथम-दुसरे वर्ष
प्रथम श्रेणी-दीपाली परब,जीविका गावकर. याचा खास सन्मान झाला.दिपाली परब यांनी आभार मानले

संपर्क 8369539769/9819957223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *