
न्हावेली प्रतिनिधि
दिनांक:१५ ऑक्टोंबर २०२४
मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीरात स्व.उदय खानोलकर यांचा स्मृतीदिन तसेच ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.ग्रंथालयाच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात स्व. उदय खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून आदरांजली वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष मा.श्री.महेश खानोलकर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.ॲड.डि.के.गावकर तसेच ॲड. प्राची गावकर उपस्थित होत्या.
यावेळी मळगाव सुपुत्र तसेच स्व.उदय यांचे शालेय मिञ ॲड. डि.के.गावकर यांचा आपल्या वकीली व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव वकील म्हणून पुणे याठिकाणी पुरस्कार देवून सन्मान झाल्याबद्दल ग्रंथालयातर्फे मा.ॲड.डि.के.गावकर यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी यांनी आपल्या व्यवसायामध्ये अनुभवलेले किस्से सांगितले तसेच शाळा सोबतच्या स्व.उदय यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.महेश खानोलकर यांनी प्रमुख अतिथी ॲड.डि.के.गावकर यांच्या वकीली यशाबद्दल आपले विचार मांडले. अलीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने शालेय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणाच्या दृष्टीकोनातून मुलांना लिहीते, वाचते करण्यासाठी ग्रंथालयाने ग्रंथ वाचून त्यावर परीक्षण करण्यासाठी मुलांसाठी उपक्रम राबवावा असे मत श्री. प्रभाकर तेली यांनी मांडले, त्या दृष्टीने कार्यक्रम घेण्याचे ठरविले.
ग्रंथालयाच्या या वर्धापन/स्मृतीदिन कार्यक्रमाला ग्रंथालयासंबंधी वाचक उदय प्रेमी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.पृथ्वीराज बांदेकर तसेच आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे कार्यवाह श्री.गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.
