आताच शेअर करा

सिंधुदूर्ग संपादकीय

दिनांक: १३ ऑक्टोंबर २०२४

नवरात्री उत्सवानंतर मांसाहार करणारे व चविष्ट माशांचा आस्वाद लुटणारे आज मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले. नवरात्रीचा उत्सव झाल्यानंतर मासे खरेदी करण्यासाठी आज इन्सुली येथील आर टी ओ जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला मासे घेऊन बसणाऱ्या व्यापाऱ्यांसमोर  हे दृश्य दिसुन आले. मासे विकणाऱ्यां समोर आज दुचाकी वाहनांची व मासे खवय्यांची गर्दी झाली होती. सध्या स्थिती या धुद्वगती मार्गावर फ्लाय ओव्हरचे काम चालू झाले आहे. त्यामूळे तेथील बरीचशी महामार्ग लागतची दुकाने खाली करण्यात आली आहे. पण मासे विकणारी मंडळीनी अजुन  तेथील जागा खाली न केल्याने  मोटार सायकलने हा रस्ता जाम केला होता. महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनास अडथळा निर्माण होत होता. तरी संबंधित ठेकेदाराच्या माणसांनी मासे विकणाऱ्या व्यवसायिकांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण ते असफल ठरले.संबंधित ठेकेदाराने काम  करत असताना या मासे व्यवसायिकांना योग्य ती जागा द्यावी. काम करत असताना कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये  याची काळजी घ्यावी.अशी कुजबुज गिराहिकांकडून ऐकण्यास येत होती.

संपर्क:8369539769/9819957223                                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *