न्हावेली प्रतिनिधि
दिनांक: १२ ऑक्टोंबर २०२४
श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ,आयोजित तळवणे येथे निमंत्रित भजन स्पर्धेत रेवटेवाडी येथील श्री भवानी भज मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.व्दितीय क्रमांक इन्सुलीच्या श्री देवी माऊली सेवा संघ भजन मंडळाने तर कारिवडे येथील कालिका भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे – उत्कृष्ट हार्मोनियम – ब्राम्हणदेव भजन मंडळ,मळेवाड ( प्रथमेश मोरजकर ) उत्कृष्ट गायक – श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ,पावशी ( सौ.प्रियांका तवटे ) उकृष्ट पखवाज – श्री भवानी भजन मंडळ,न्हावेली ( सचिन पांगम ) उकृष्ट तबला – कालिका भजन मंडळ,कारिवडे ( प्रथमेश नाईक) उत्कृष्ट झांजवादक – ( श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ,पावशी ) उत्कृष्ट कोरस – ( गुरुकुल संगीत भजन मंडळ,कुडाळ ) उकृष्ट शिस्तबद्ध संघ – ( गुरुकुल संगीत भजन मंडळ,कुडाळ ) उकृष्ट प्रार्थना – ( प्रथमेश मोरजकर ) जय जय राम ( नितीन मेस्री ) रूपक – ( श्री देवी भवानी भजन मंडळ, रेवटेवाडी) गजर – ( जय गणेश भजन मंडळ,सुतारवाडी ) अभंग – श्री देवी माऊली भजन सेवा संघ इन्सुली ( वैभवी राणे ) गौळण – ( जय गणेश भजन मंडळ,तळवणे ) ज्ञानेश्वर माऊली गजर ( गुरुकुल संगीत भजन मंडळ,कुडाळ ) यांची निवड करण्यात आली.स्पर्धेत सात भजन संघानी सहभाग घेतला होता.परिक्षक म्हणून रुपेंद्र परब ( अणसूर ) व भावेश राणे ( रेडी ) यांनी काम पाहिले.

