बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:१३ ऑक्टोंबर २०२४
मडूरा (बाबरवाडी) येथील कु. साहिल सावळाराम नाईक यांना उपचारादरम्यान हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता घरातील परिस्थिती हालाकीची असताना वैद्यकीय उपचारासाठी काही रकमेची गरज भासली होती. ही गरज भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पुर्ण केली आहे. ही आर्थिक सहकार्य करून गरज भगविल्या मुळे मुलाचे वडील श्री. सावळाराम नाईक यांनी त्यांचें आभार मानले आहेत.

