
सिंधुदुर्ग संपादकीय
दिनांक:१२ ऑक्टोंबर २०२४
सरमळे नांगरतास वाडी येथील माधव घराण्यातील माधव वस देवतेचा कॉल देण्याचा कार्यक्रम ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी संपन्न झाला.
नवरात्रीनिमित्त माधव वस देवतेकडे घट बसविला जातो.येथिल भवानी देवीची विधीवत पूजा केली जाते. नऊ दिवस घटावर पुष्प माळ सोडली जाते. तसेच रात्रीच्या वेळी विविध कार्यक्रम आणि भजने होत असतात. नवव्या दिवशी याची सांगता होऊन खरगापूजन म्हणजेच घरातील असलेल्या उपयोगी वस्तू तसेच हत्यारे पूजेला लावून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते. दुपारच्या वेळेत सर्व भाविकांना अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो. या अन्नदानाच्या वेळी जेवण करी ठेऊन त्यांची विधीवत पूजा करून त्यांना जेवण देण्यात येते. देवी समोर प्रथम माधव घराण्यातील सुखवस्तीस असणाऱ्या प्रत्येक गावातील व्यक्ती येऊन देवीला हातभेटीचा नारळ ठेऊन रखवालीसाठी गाराणे घालण्याची प्रथा आहे. त्यानंतर लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, माधव घराण्यातील महीला आणि ग्रामास्थ महीला मिळुन नवसाच्या आणि हात भेटीच्या ओट्या भरतात. गावराठीच्या अंधारांना कौल मागण्यासाठी हाक मारली जाते. सर्व देव एकत्र येऊन माधववस देवा सह सर्व देव माधव घराण्यातील माणसांना व ग्रामस्थांना सुखवस्थीचा कॉल दिला जातो. अशाप्रकारे सालाबात प्रमाणे हा कार्यक्रम केला जातो.

