
बांदा प्रतिनिधि
दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४
नवरात्री उत्सवानिमित्त मडूरा श्री देवी माऊली मंदिरात शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्रौ ठीक ९:०० वाजता रेडकरवाडी मित्र मंडळ मडूरा ग्रामस्थ आयोजित खास लोका आग्रहास्तव देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण, लोकप्रिय दशावतारी कलावंतांच्या सानिध्यात महान पौराणिक अध्यात्मिक हृदयस्पर्शी नाट्यपुष्प “वेडा चंदन”सादर होणार आहे. वेडा चंदन च्या प्रमुख भूमिकेत लोकप्रिय राजा उदय राणे- कोनसकर ही भूमिका साकारणार आहेत.तसेच 💐नाटकातील कलावंत- उदय राणे, जानू वरक, बाळा कलिंगण, संतोष चाळके, प्रथमेश खवणेकर,सुधीर हळदणकर,मंगेश साटम, सचिन हडकर, प्रल्हाद गावकर, आणि आप्पा नाईक💐 संगीत साथ हार्मोनियम- अमोल मोचेमाडकर पखवाज- दादा आकेरकर, ताल रक्षक- विनायक सावंत सहाय्यक – प्रकाश राणे, शंकर धुरी💐 संपुर्ण नाटय संच मिळून हे नाटक सादर करणार आहेत. मायबाप रसिक प्रेक्षकांनी या नाटय पुष्पाचा लाभ घ्यावा यासाठी रेडकरवाडी मित्र मंडळ मडुरा व ग्रामस्थ यांच्याकडून विनंती करण्यात आली आहे.