
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:४ ऑक्टोंबर २०
बांदा येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत असून उत्सवात ३ ते १० ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान दररोज सकाळी श्रींची विधिवत पूजा दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद महाप्रसाद व सायंकाळी स्थानिकांची भजने व विविध कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी देवीची पूजाअर्चा घटस्थापना होईल.बांदा शहरातील गांधी चौक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ , यांच्या तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात दिनांक ३ रोजी रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध जादूगार केतन कुमार यांचा जादूचा प्रयोग होणार आहे, शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ यांचा भैरी भवानी हा नाट्यप्रयोग होणार आहे, शनिवार व रविवार दिनांक ५व ६ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या दांडिया स्पर्धा तर सोमवार व मंगळवार दिनांक ७ व ८रोजी खुली सिनेगीत कराओके स्पर्धा, ग्रुप डान्स व रेकॉर्ड डान्स स्पर्धा(१६ वर्षावरील) होणार आहेत त्याचप्रमाणे बुधवार ०९ ऑक्टोबर रोजी डबलबारी चा सामना होणार आहे, गुरुवार १० ऑक्टोबर रोजी फॅन्सी ड्रेस (१६ वर्षाखालील) व रेकॉर्ड डान्स (१६ वर्षाखालील) तसेच शुक्रवार ११ऑक्टोबर रात्री भव्य ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम होणार आहेत. सर्वानी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले आहे.