
सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर
दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४
घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे.
या स्पर्धेसाठी मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ५००० रु व चषक, द्वितीय क्रमांक ३००० रु व चषक, तृतीय क्रमांक २००० रु व चषक तर लहान गटासाठी प्रथम क्रमांक ३००० रु व चषक,
द्वितीय क्रमांक २००० रु व चषक, तृतीय क्रमांक १००० रु व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेतील
सहभागी सर्व स्पर्धकांसाठी चषक व प्रमाणपत्र आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील
इच्छुक स्पर्धकांनी राजकुमार घावनळकर 9421416894 आणि मायकल फर्नांडिस 9923099547 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाने केले आहे.