
गोवा :पेडणे प्रतिनिधि
दिनांक:१ ऑक्टोंबर २०२४
मोरजी दुर्गा पुजनोत्सवात विविध कार्यक्रम
पेडणे (प्रतिनिधी )
मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा समिती आयोजित दुर्गा पुजन उत्सव ३ ते ११ पर्यंत विविध कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवार ३ रोजी सुचिता निवृत्ती शिरोडकर व कृतिका कृष्णा पेडणेकर यांच्या हस्ते दुर्गा देवीची विधिवत पूजा व घटस्थापना दुपारी आरती महाप्रसाद सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्धाटन मानसी निवृत्ती शिरोडकर हीचे गणेश वंदन नृत्य त्यानंतर मानसी म्हामल मांद्रे संचालित सात्विक डान्स स्टुडिओ यांचा नृत्याचा कार्यक्रम शुक्रवार ४ रोजी मेधा मेघश्याम नाईक व दिपा रघुनाथ शेटगांवकर यांच्या हस्ते नित्य पूजा सायंकाळी ६.०० वाजता श्री दाडोबा सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मरडीवाडा मोरजी यांचा भजनाचा कार्यक्रम त्यानंतर नाट्यारंभ स्कूल ऑफ आर्ट मोरजी यांचा नृत्याचा कार्यक्रम शनिवार ५ रोजी अँड. मुक्ता आनंद शेटगांवकर व सुनिता जनार्दन तांडेल यांच्या हस्ते नित्य पूजा सायंकाळी ६.०० वाजता श्री दिवाणजी साई महिला घुमट आरती मंडळ तेंबवाडा मोरजी यांची घुमट आरती त्यानंतर श्री दत्त महिला मंडळ बागवाडा मोरजी यांचा संस्कृती दर्शन व सांगितिक कार्यक्रम. रविवार ६ रोजी प्रार्थना शेखर पोके व नालंदा गौतम शेटगांवकर यांच्या हस्ते नित्य पूजा सकाळी १०.३० वाजता ई. ५ वी ते ७ वी व ई. ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा ११.३० वाजता मोरजी ग्राम मर्यादित महिलांसाठी पाककला स्पर्धा सायंकाळी ७.०० बागवाडा युवक पुरस्कृत विश्वजीत मेस्त्री पुणे व हर्षा गणपुले गोवा यांचा गायनाचा कार्यक्रम त्यांना शिवानंद दाभोलकर (हार्मोनियम) दत्तराज च्यारी (तबला) किशोर तेली ( पखवाज) प्रतिक गडेकर ( मंजिरी) परेश नाईक (निवेदन) सिद्धेश / कृष्णा नाईक ध्वनिसंयोजन यांची साथसंगत लाभणार आहे सोमवार ७ रोजी श्रध्दा श्रीकृष्ण आसगांवकर , रुपा आनंद शेटगांवकर , प्रिया भानुदास सावळ यांच्या हस्ते नित्य पूजा सायंकाळी ६.०० वाजता पेडणे तालुका मर्यादित दांडिया स्पर्धा मंगळवार ८ रोजी पुनम राजेश शेटगांवकर, मनिषा प्रमोद रेडकर, स्नेहा दत्तप्रसाद तिळोजी यांच्या हस्ते नित्य पूजा सायंकाळी ५.०० वाजता शिवानंद दाभोलकर व शिष्य परिवारातर्फे सांगितिक कार्यक्रम ७.०० वा. संत समाज मोरजी यांचा अर्थव शिष्य पठण व भवानी अष्टकम कार्यक्रम बुधवार दिनांक ९ रोजी पुनम नरेश शेटगांवकर, राधिका सागर च्यारी, सिया संदेश नागोजी यांच्या हस्ते नित्य पूजा सायंकाळी ६.०० वाजता कु. साईदिप गुणाजी शेटगांवकर यांचे तबला एकल वादन त्यानंतर यश आगरवाडेकर निखिल म्हामल कैशल कान्नाईक प्रथम हळदणकर गणेश पांच्याळ क्रिष साळगांवकर यांचा समुह तबला वादन नगमासाथ सदनायक कळंगुटकर ७.०० वा. विनोद पेडणेकर पुरस्कृत गोपाळकृष्ण रवळनाथ आरती मंडळ एकोशी यांची घुमट आरती गुरुवार १० रोजी कुंदा रोहिदास दाभोलकर, पुष्पलता हनुमंत पेडणेकर प्रणाली सर्वेश कोरखणकर यांच्या हस्ते नित्य पूजा सायंकाळी ५.३० वाजता मोरजी ग्राम विकास मंच ट्रस्ट पुरस्कृत शिष्यवृत्ती प्रदान सोहळा ७.०० वाजता नृत्य मार्ग मोरजी यांचा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम शुक्रवार ११ रोजी सुचिता निवृत्ती शिरोडकर व कृतिका कृष्णा पेडणेकर यांच्या हस्ते नित्य पूजा दुपारी आरती महाप्रसाद सायंकाळी ६.०० वाजता दिंडीच्या जयघोषात विसर्जन मिरवणूक श्री दत्त देवस्थानापासून तेंबवाडयापर्यंत