आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि

दिनांक १ ऑक्टोंबर २०२४

हॅन्ड्बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलची विभागीय पातळीवर निवड
बांदा : प्रतिनिधी
बांदा येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय हॅन्डबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मडुरा हायस्कुलच्या मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयामुळे मडुरा हायस्कुलच्या कौतुकात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाला अंतिम अटीटतीच्या सामन्यात उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या संघांना क्रीडा शिक्षक महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तब्बल दहा वर्षानंतर विभागीय पातळीवर निवड झाल्याने आनंद व्यक्त होतं आहे.
मुलींच्या संघामध्ये अलिषा गावडे, आर्या गवस, उर्वशी शेर्लेकर, क्लेरिसा रोड्रिक्स, चैत्रा नाईक, तपस्या धुरी, दृष्टी सातार्डेकर, पलक गावडे, प्रियांका तूयेकर, सानिका गावडे, स्नेहा केरकर, हर्षदा नाईक, निधी किडजी, श्रेया गावडे या खेळाडूंचा समावेश होता. संस्थेचे कार्याध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारीनी सदस्य, मुख्याध्यापक, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *