सिंधुदूर्ग/संपादकीय
दिनांक: २९ सप्टेंबर २०२४
नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅजिक जादू फेस्टिवल २०२४ मध्ये भारतातील व परदेशातील ४०० हून अधिक जादूगाराने दोन दिवसाच्या संमेलनात भाग घेतला त्यामुळे हा फेस्टिवल यशस्वी झाला भारतातील जादूगार काश्मीरपासून ते कन्याकुमारी ते हिमाचल प्रदेश, तसेच गोवा, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यातून नामवंत जादूगार या संमेलनासाठी आले होते त्यांच्यासोबत परदेशातील जादूगार ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, कोरिया, सिंगापूर, दुबई, श्रीलंका, कतार अशा अनेक देशातून आले होते. त्यांनी आपल्या देशातील जादू विषयी आणि त्यातील शिस्तीविषयी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात जादूचे प्रयोगही सादर केले त्याचबरोबर भारतातील प्रत्येक राज्यातील जादूगारांनी ही आपल्याकडील विशेष जादूच्या प्रयोगांचे सादरीकरण केले व त्यामागील रहस्यही सांगितले या संमेलनाचा एक भाग म्हणून वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड या विशेष कार्यक्रमात काही मोजक्याच जादूगारांना आपली कला सादर करण्यासाठी निवड करण्यात आली त्यात सिंधुदुर्गाचे सुपुत्र आणि ज्यांनी आजवर देशामध्ये शेकडो जादूचे प्रयोग उत्कृष्टपणे सादरीकरण केलेल्या जादूगार वैभवकुमार यांची निवड झाली त्यामुळे त्यांना दिल्ली महोत्सवात आपले जादुचे प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली जादूगार वैभवकुमार यानी दिल्ली फेस्टिवल मध्ये आपल्या जादूने त्यांच्याकडे असलेल्या रिकामी पिशवीतून जादूने मॅजिक ट्रिक करुन भारताचा मोठा झेंडा काढून प्रेक्षकांसमोर जादूच्या काठीला लावून फडकवला तसेच आणखीन एक प्रयोग म्हणजे मॅजिक टू म्युझिक या पुस्तकातून चित्रातील गिटारला खरीखुरी गिटार बनवून दाखवून ती प्रेक्षकांसमोर वाजवून दाखविली या दोन्ही प्रयोगाने जादूगार वैभवकुमार यांना या उत्कृष्ट प्रयोगाच्या सादरीकरणामुळे इंटरनॅशनल मॅजिक फेस्टिवलमध्ये टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांनी दाद दिली म्हणून त्यांना वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्डचा किताब त्यांना देऊन तसेच स्मृतिचिन्ह, मोमेंटो, गोल्ड मेडल, सर्टिफिकेट्स व त्यांच्या नावाचा स्कार्फ देऊन आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले त्यामुळे या महोत्सवात सिंधुदुर्गचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचले. बाहेरून आलेल्या देश विदेशातील जादूगारांनी जादूगार वैभवकुमार यांच्या प्रयोगाचे मोबाईलवर शूटिंग करून परदेशात पाठविले जादूगार वैभवकुमार यांनी आजवर देशातील अनेक कन्वेंशनमध्ये भाग घेऊन सिंधुदुर्गाचे नाव उज्वल केले आहे. आजवर झालेल्या पुणे, मुंबई, सुरत, हैदराबाद, सिकंदराबाद, बेंगलोर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी या महोत्सवांना जाऊन तिथे आपली कला सादर करून महाराष्ट्राचे व आपल्या जिल्ह्याचे नाव प्रसिद्ध केले लवकरच ते परदेशात जाऊन आपली कला सादर करणार आहेत या संमेलनाला आलेल्या विदेशी जादूगारानेही आपल्या देशात येऊन आपली जादूची कला सादर करावी यासाठी जादूगार वैभवकुमार यांना निमंत्रित केले आणि लवकरच त्यांची परदेशी दौऱ्यावर जाण्याची तयारी सुरू आहे. लहानपणापासून जादूची आवड असणाऱ्या वैभव पारकर म्हणजे जादूगार वैभवकुमार यांनी पारंपारिक नोकरी किंवा व्यवसाय न निवडता एक आगळावेगळा व्यवसाय निवडला तो म्हणजे जादूचे प्रयोग सादर करून लोकांचे मनोरंजन व लोक जागृती करण्याचा त्यांनी संकल्प केला त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे हे आपल्या जादूच्या प्रयोगातून ते दाखवीत असतात, जादूला भाषा नसते, वय नसतं अगदी पाच वर्षाच्या मुलांपासून ते ८०-८५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांचा कार्यक्रम फार आवडतो ते त्यांच्या कार्यक्रमाला मनापासून खळखळून हसत दाद देताना आपले वयही ते विसरतात या सर्वांचा आशीर्वाद जादूगार वैभवकुमार यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच त्यांना आजवर शेकडो कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त झाली ते भारतात असेपर्यंत अनेक राज्यात भरणाऱ्या जादू संमेलनाला ते जाणार आहेत, शिका आणि शिकवा हा त्यांचा मंत्र आहे. शिवाय आपले सारखे रसिक प्रेक्षक त्यांना आशीर्वाद देत आहेत त्यांनी दिल्लीत लावलेला जादूचा झेंडा असाच देश विदेशात फडकत राहील असे उदगार दिल्लीतील जादू संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक खरबंदा यांनी आपल्या भाषणात काढले, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतात असेच एक मोठे जादूसंमेलन जगन्नाथपुरी येथे होणाऱ होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रणही त्यांना आताच दीले असून ते या संमेलनाला जाऊन पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट जादूच्या प्रयोगाचं तिथे सादरीकरण करून सिंधुदुर्गाच नाव उज्वल करणार आहेत. जादूचा इतिहास व आधुनिक काळातील जादू या विषयावर त्यांचे पुस्तक लेखन सुरू आहे लवकरच ते प्रसिद्ध होईल असे ते म्हणाले त्यांचे आजवरचे जादूचे विडीओ जादूगार वैभवकुमार या यूट्यूब चानलवर आपण पाहू शकता.