गोवा: पेडणे प्रतिनिधि
दिनांक २१ सप्टेंबर २०२४
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्रा येथे उद्या संध्या. ७.०० वा. अभिनव कला थिएटर्स मांद्रे तर्फे संगीत मत्स्यगंधा या नाटकाचा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.२१ दिवसीय हा गणेशोत्सव विविध कार्यक्रमानी साजरा होत आहे. राजीव कला मंदिर फोंडा आयोजित आठव्या महिला नाट्य स्पर्धेत या नाट्यनिर्मितीस तृतीय पारितोषिक प्राप्त झाले होते. या व्यतिरिक्त वैयक्तिक सहा पारितोषिकांचे मानकरी या नाटकातील नाट्य कलाकार ठरलेले आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन श्री प्रशांत मांद्रेकर यांनी केले असून या नाटकाची संगीताची बाजू उद्देश पेडणेकर व बबन आरोंदेकर सांभाळतील. पार्श्व संगीत निलेश नाईक तर ध्वनी संकलन सुभाष शिरोडकर (बांदा) यांच असेल. प्रकाश योजना व रंगभूषा अनुक्रमे रत्नाकर साळगावकर आणि विशाल मांद्रेकर यांची असेल तर नेपथ्य व वेशभूषा प्रमोद मांद्रेकर व सोपेटे नाट्य भांडार पार्से हे सांभाळतील. या नाटकाचे निर्माते आहेत रावजी कोनाडकर आणि सूत्रधार सोमनाथ पार्सेकर.
या नाटकात अनुक्रमे मृण्मयी मांद्रेकर, कनक कोनाडकर, वैष्णवी मेथर, रवीना चारी, शारदा शेटकर शारदा आरोंदेकर, अंन्सिका नाईक आणि मैथिली नाईक आपापल्या भूमिका सादर करतील.