गोवा:हरमल प्रतिनिधि
दिनांक:२० सप्टेंबर २०२४
साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी गोमंतकीय मराठी साहित्य पुरस्कार गोवा मराठी अकादमीने विविध पुरस्काराची योजना जाहीर केली होती.
पुरस्कारासाठी साहित्यिकांकडून एकूण ४७ पुस्तके आली होती. पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि साहित्यकृती मध्ये साहित्यिक व लेखक भावार्थ मांद्रेकर यांची पुरस्कारासाठी वर्णी लागली आहे. भावार्थ मांद्रेकर यांनी आत्ताच अलीकडच्या काळात “खंबीर सरनौबत हंबीरराव” चरित्र लिहिले त्यांना अ.का.प्रियोळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. कणकवलीतील प्राध्यापक मोहन कुंभार आणि गोमंतकीय ज्येष्ठ मराठी साहित्यिक नारायण महाले यांनी पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना प्रत्येकी १०,०००हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजता वास्को येथील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या वर्धापन दिन समारंभात मराठीतील नामवंत लेखक मिलिंद जोशी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.