गोवा: पेडणे प्रतिनिधि
दिनांक: १६ सप्टेंबर २०२४
पेडणे विर्नोडा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर भीषण अपघात होऊन एक जण ठार होण्याची घटना आज पहाटे चार- सव्वा चारच्या दरम्यान घडली.
पेडणे तालुक्यातील विर्नोडा राष्ट्रीय महामार्ग ६६ या ठिकाणी दिनांक १६ रोजी पहाटे एम एच झिरो ८ एपी६५४३ आणि कोंबडी घेवून जाणारी बोलेरो जीए ०६ टी ९२८६ ही बोलेरो पेडणे म्हापसा येथे जात असता विर्नोडा संत सोहिरोबानाथ अंबिये शासकीय महाविद्यालयासमोर भीषण अपघात होऊन लोरी एम एच झिरो ८,येपी ६५४३ या वाहनाने मागे धडक देऊन बोलेरो चा चालक नियाझ झारी वय वर्ष ३० जागीच ठार झाला. तर दोन युवक जखमी होण्याची घटना घडली. अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरून पळ काढून पळत होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करून धारगळ येथे पकडण्यात त्यांना यश आले.
१६ सप्टेंबर रोजी पहाटे चार ते सव्वा चार वाजता दोन्ही वाहने पेडणे मार्गे म्हापसा येथे जात होती. बोलेरो वाहन समोरून जात होते. त्याच्या मागून लॉरी ट्रक घेऊन ट्रकने जबरदस्त धडक दिली. आणि बोलेरोतील सर्व कोंबड्या सहित जमिनीवर कोसळला आणि चालक नियाच झारी हा जागीच मृत्यू झाला
अपघात होताच लॉरी तिथं न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. याविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून धारगळ येथे लॉरी पकडली आणि वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले.
पेडणे तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून मागच्या दोन दिवसांपूर्वी मांद्रे येथे भीषण अपघात होऊन भावजय नणंद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा विर्नोडा येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन नियाच याला जीव गमवावा लागला.
पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला.मृत देह बांबोळी येथे चिकित्सेसाठी पाठवण्यात आला.वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले.