(गोवा): पेडणे प्रतिनिधि
दिनांक: २५ ऑगस्ट २०२४
टॅक्सी व्यावसायिकांचे चौथ्या दिवशीही पावसात आंदोलन सुरूच , आज मुख्यमंत्री टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार, व्यवसायिकां कडून त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याची अपेक्षा असून गेले चार दिवस हे आंदोलन सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ टॅक्सी व्यवसायिकांचे चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी भर पावसात आंदोलन सुरूच . शुक्रवारी रात्री उशिरा पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सोमवारी दुपारपर्यंत त्या विषयावर तोडगा काढण्याचं आश्वासन लिखित स्वरूपाचे पत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर संघटनेचे ठराविकच पदाधिकारी मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या बैठकीनंतर परत रात्री उशिरा आंदोलन स्थळी दाखल झाले.
त्यानंतर आंदोलन करणाऱ्या सहकार्यांसोबत पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन या बैठकीत जोपर्यंत मुख्यमंत्री ठोस कृतीचा आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सोमवार पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी सर्वांनी घेण्यात आला. त्यानंतर चौथ्या दिवशी आंदोलन मुसळधार पावसातही सुरूच राहिले .