(गोवा): पेडणे प्रतिनिधि
दिनांक:२५ ऑगस्ट २०२४
कायम समाजातील दुर्बल घटकांच्या पाठीशी राहणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्था व कोरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच गोवा राज्यात महिलांसाठी “ज्वेलरी मेकिंग” हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचा उदघाटनाचा कार्यक्रम आज कोरगाव, तालुका पेडणे येथील कमळेश्वर सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर कोरगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. अनुराधा कोरगावकर, ग्रामपंचायत पंच उमेश चारी, कोकण विकास संस्थेचे हनुमंत गवस, डी एस एन चे संपादक प्रमोद गवस, प्रशिक्षण मार्गदर्शक सौ.सेजल गावडे, आदर्श गटाच्या नेहा तेरसे, ओंकार गटाच्या स्वाती गवंडी, नंदनवन गटाच्या अनुजा पार्सेकर, सी आर पी निकिता तोरस्कर, सी आर पी निता देसाई व प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.
दिप प्रज्वलनांने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे हनुमंत गवस यांनी करताना या संस्थेचे कार्य तसेच उद्दिष्ट स्पष्ट केली,त्यांनतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ. अनुराधा कोरगावकर यांनी प्रशिक्षनार्थीना शुभेच्छा दिल्या तसेच या प्रशिक्षणाचे बारकावे शिकून घ्या, त्यांनतर स्वयंरोजगारासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे सांगताना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक सौ. श्रुती तारी यांनी केले तर आभार हनुमंत गवंसं यांनी मानले या प्रशिक्षणात एकूण ४०प्रशिक्षणार्थी सहभागी असून ५ दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम चालणार आहे.