(गोवा ) पेडणे प्रतिनिधि
दिनांक: २४ ऑगस्ट २०२४
मोरर्जी पंचायत क्षेत्रातील भाटी वाडा येथील स्थानिक नागरिक आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना वरचा वाडा डोंगर माळरानावर रस्त्याच्या बाजूलाच एक गेट लावून पायवाट आणि शेतामध्ये डोंगर माळरानावर किंवा देवाचं स्थळ आहे. त्या ठिकाणी विधी करण्यास जायला अडचणी होत होत्या. त्या संदर्भात नागरिकांनी आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपण मोरर्जीवासीयावर अन्याय करू देणार नाही. जी पायवाट किंवा रस्ता अडवण्यात आला. ती गेट खुली करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली होती. त्यानुसार संबंधित रस्त्याच्या बाजूला लावलेली गेट २३ रोजी खुली करण्यात आल्यामुळे मोरजी वासियानी आनंद व्यक्त केला.
डोंगर माळरानावरील जमिनी मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीयानी विकत घेऊन, त्या ठिकाणी ना विकास झोन भागातील जमिनी टीसीपी विभागाला आणि राजकर्त्यांना हाताशी धरून जमीन रूपांतरीत करण्याचा सपाटा चालवलेला आहे. त्यानुसार मोरजी वरचा वाडा डोंगर माळरानावरील 80% डोंगर जमिनी विक्रीस गेलेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भविष्यात विला फार्म हाऊस च्या नावावर इमारती बंगले उभे राहणार आहेत. त्यासाठी संबंधिताचे प्रयत्न आहेत. जो रस्ता पूर्वी पाण्याच्या टाकीसाठी तयार केला होता. तोच रस्ता पुढे नेत असताना त्या रस्त्यावर मधोमध गेट लावून इतर लोकांना तो रस्ता बंद करण्यात आला. परंतु लोकांचं जाणं येणं माळरानावर चालू होतं. त्या ठिकाणी देवाचं स्थळ आहे. त्या ठिकाणी दरवर्षी काही विधी गावकरी करत असतात. त्यांनाही त्या ठिकाणी जाता येत नव्हतं .त्या संदर्भात मोरजीवासीयानी ग्रामसभेमध्ये वेळोवेळी आवाज केला. सरकारला निवेदन सादर केले. मात्र यापूर्वी सरकारने दखल घेतली नाही. मात्र ज्या मागच्या चार दिवसांपूर्वी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि ग्रामस्था सोबत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले .त्यानंतर घडामोडीला सुरुवात झाली.
मोरर्जी भागातील काही जमीन मालकांनी आपल्या जमिनी ज्या जमिनी पूर्वजाने पुढील पिढीसाठी राखून ठेवल्या होत्या. त्या जमिनी अव्वाच्या सव्वा दर मिळत असल्यामुळे त्या जमिनी विकून टाकलेले आहे. जमिनी विकत घेतल्यानंतर जमीन व्यावसायिकांनी आपापले प्रकल्प आणण्याचा सपाटा चालवला. काही प्रमाणात डोंगर टेकड्या सपाटीकरण करण्यात आल्या. काही झाडेही कापण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी वेळोवेळी केला. तक्रारी केल्या. मात्र तक्रारीची दखल सरकार मार्फत घेतली जात नव्हती.
भाटी वाडा भागातील स्थानिक नागरिकांनी आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना निवेदन सादर झाल्यानंतर मात्र रस्त्यावरील गेट 23 रोजी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलेल्या ग्वाहीनंतर खुली करण्यात आली. ती गेट कायमचीच खुली करावी. अशी मागणी सध्या मोरर्जीवासियांनी केली असून सध्या मोरजेकर एकत्रित पणा दाखवल्याने विजयी झाल्याचा काही नागरिक आपल्या प्रतिक्रिया देताना सांगतात.
दरम्यान डोंगर माळरानावर जाणारी पायवाट रस्ते अडवल्याप्रकरणी आणि ज्यांनी कोणी जमिनी विकून मोर्जीवासियानावर अन्याय करत आहे. अशा लोकांना तीन दिवसाच्या आत देवाने शासन करावं. अशी सामुदायिक गाऱ्हाणे गावकऱ्यांनी श्री देव सत्पुरुष आणि श्री देव कानडी वंश देवाला सामुदायिक गावकऱ्यामार्फत घातले होते.
मांद्रे चे आमदार जीत आरोलकर यांच्याकडे संपर्क साधला असता आमदार जीत आरोलकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ज्या पद्धतीने डोंगर माळरानावर जाताना रस्त्या आणि पायवाट अडवण्याचा प्रयत्न संबंधिताने केला होता. आणि ती पायवाट आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करून सोडवण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसारच ही गेट हलवण्यात आल्याने हा प्राथमिक स्तरावर मोरर्जीवासियांचा विजय असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगून यापुढे कुणावरही आपण अन्याय होऊ देणार नाही. ज्या पद्धतीने जे कोणी बेकायदेशीर स्थानिकांची अडवणूक करेल, आणि पायवाटा किंवा रस्त्या अडवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर सरकारमार्फत कारवाई करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. असे सांगून जी पायवाटा अडवण्याचा प्रकार आणि त्या ठिकाणी काही पोल घालण्यात आले, तेही पोल काढून टाकण्यात यावे. अन्यथा त्यांच्यावर सरकार कठोर कारवाई करेल. असा इशारा आमदार जीत आरोलकर यांनी दिला.