आताच शेअर करा

(गोवा): पेडणे प्रतिनिधि

दिनांक:२२ ऑगस्ट २०२४


राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पेडणेत येऊन ठोस आश्वासन देत नाही. आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. पेडणेतील टॅक्सी व्यवसायिकांनी हजारोंच्या संख्येने पेडणेत मोर्चा काढून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सकाळी १०.३० वा. श्री भगवती देवीला श्रीफळ ठेवून व साकडे घालून  आंदोलनाला सुरुवात झाली. दिवसभर पाऊस असूनही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडण्यातील स्थानिक टॅक्सी व्यवसायिकावर होणाऱ्या अन्याय विरोधात आज पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर,  आमदार क्रूस  सिल्वा, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विर्यातो ,मांद्रे माजी सरपंच विद्यमानपंच एडवोकेट अमित सावत, काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर, संजय बर्डे सामाजिक कार्यकर्ते दीपेश नाईक,  रामा आणि काणकोणकर ,  शिव वॉरियस संघटनेचे रामा वारंग, निखिल महाले, योगेश गोवेकर, आनंद,गावकर सामाजिक कार्यकर्त्या  तारा केरकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, देवेंद्र प्रभूदेसाई, गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळंगुळकर, धर्मेश सगलानी ,सामाजिक कार्यकर्ते रामा कानकोणकर, गोवा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत, टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर, मिशन फोर लोकलचे राजन कोरगावकर,  चांदेल – हसापूरचे सरपंच तुळशीदास गवस, पेडणे पालिकेचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक विष्णू साळगावकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, वारखड  उपसरपंच, वसंत नाईक, माजी सरपंच गौरी जोसलकर, माजी सरपंच निशा हळदणकर ,उपसरपंच सिद्धी गडेकर, , माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, सूर्यकांत तोरस्कर आद विविध क्षेत्रातील नेते उपस्थित होते

  काऊंटर, टोल, वाढीव पार्किंग शुल्क, गोवा माईल्स काढावा. अशा काही मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यां पासून पेडणेतील स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांचे आंदोलन सुरू आहे. गोवा  मुख्यमंत्री यांनी टॅक्सी व्यवसायिकांना आश्वासन दिली होती.  ती आश्वासनाची पूर्तता  न झाल्यानेच टॅक्सी व्यावसायिकाने आंदोलनाचा पवित्र घेतला. यांनी अनेकदा आश्वासन देऊनही टॅक्सी व्यवसायिकांच्या मागण्या मान्य होत नसल्यानेच टॅक्सी व्यवसायिकांनी कडक भूमिका घेतली आहे.
       दरम्यान मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पेडणेत येऊन ठोस आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. असा पवित्र घेत आंदोलन सुरूच ठेवले. काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
        पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले मी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र आंदोलन कर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पेडणेत येऊन बैठक घ्यावी. असा पवित्रा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्या संध्याकाळी ६ वा. भेटायला बोलावले आहे.
  दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार कॅप्टन विर्यातो यांनी आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करत हा विषय आपण केंद्रात पोचवणार असल्याचे सांगून आपण नेहमीच तुमच्याबरोबर राहिलो आहे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी  खासदार झालो आहे.

पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आंदोलन कर्त्यांशी  चर्चा केली. मुख्यमंत्री दिल्लीला आहेत. त्यामुळे आज भेटू शकत नाही उद्या आपण त्यांची भेट घेतो आणि तुमच्या समस्या  त्यांच्याकडे मांडतो मात्र आंदोलन करते आपल्या भूमिकेशी ठाम राहिले.  मुख्यमंत्र्यांना घेऊन तुम्ही या ठिकाणी यावे किंवा आमचे जे प्रश्न आहे ते सोडवावे यापूर्वी असे अनेक आश्वासने दिली ती हवेत विरलेली आहेत.
यावेळी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गव्हास विविध पंचायतीचे सरपंच पंचायत सदस्य पेडणे पालिकेचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी उगेमोपा तांबोसे पंचायत चे सरपंच सुबोध महाले चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास वजरी पंचायत चे पंच सदस्य खाजणे हमारे परस कडे पंचायतीच्या उपसरपंच सिद्धी गडेकर निशा नागवेकर पंचदर्षण आढळकर  , माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ सूर्यकांत तोरस्कर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित होते विविध पंचायतीचे पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.
मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण ते असफल राहिला.


सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी सरकारवर जोरदार टीका करत सर्वसामान्यांचा गोवा राज्यातील सरकारने या गरीब जनतेचे असे हाल करू नयेत .सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे. मोपा विमानतळावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे. आणि स्थानिकांना ज्यांच्या जमिनी गेल्या ते हाल अपेष्टा सोसत आहेत. त्यावर सरकारने तातडीने लक्ष देऊन त्यांच्या समस्या आहे त्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी शंकर-पोळजी यांनी केली.

या आंदोलनात टॅक्सी व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी सरकारवर जोरदार टीका करून सरकारने तातडीने हा विषय सोडवावा न पेक्षा तीव्र आंदोलन करावे लागणार असल्याचा इशारा दिला.
शिवा वॉरियरचे रामा वारंग, निखिल महाले, योगेश गोवेकर आनंद गावकर, आदींनी यावेळी आपल्या न्याय हक्कासाठी आम्ही झगडात असल्याचे सांगून  सरकारने स्थानिकांना वेगळा काउंटर द्यावा  अशी मागणी करत आहोत.आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार क्रूस सिल्वा आमदार जीत आरोलकर खासदार कॅप्टन वीरायेतो यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि ते आमच्या सोबत आहे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल त्यांना  धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *