(गोवा) पेडणे प्रतिनिधि
दिनांक:१८ ऑगस्ट २०२४
मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदास वाडा किनारी भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दर दिवशी वाहतुकीची कोंडी होत असून त्या वाहतुक कोंडीवर ट्राफिक पोलिसांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोले यांनी केली आहे.
मोरजी विठ्ठलदास वाडा किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन हंगामात वाहतुकीची कोंडी असतेच,शिवाय आताही पावसाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक या किनारी भागात येतात
त्या वाहनासाठी योग्य ती पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालक मिळेल तिथे गाडी पार्किंग करत आहेत.त्यामूळे वाहतूक करण्यास खुप कसरत करावी लागत आहे . एकाद्या गाडीस लागल्यास भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याच्या दोन्हीं बाजूला वाहने पार्क करून वाहतुकीची कोंडीपर्यटन व नागरीक करतात. त्यामुळे एखाद्या वेळी तात्काळ काम आल्यास व त्या कोंडीतून बाहेर पडायचे असेल, तर तो नियोजित स्थळी वेळेवर पोहोचू शकत नाही.यासाठी सरकारने आणि ट्राफिक पोलीस यांनी योग्य ती दखल घेऊन उपाय योजना करावी. वाहने पार्क करून नो पार्किंग झोन जाहीर असतानाही त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी केली जाते.त्यावर सरकारने लक्ष देण्याची मागणी वाहन चालक करत आहे.
मोरजी विठ्ठलदास वाडा किनारी भागात आणि इतर किनारी भागात मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट सेक्स हॉटेल गेस्ट हाऊस विविध प्रकारची आस्थापने रस्त्याच्या बाजूलाच उभारलेले आहे. आस्थापने उभारल्यानंतर आपले ग्राहक जे वाहने घेऊन येणार त्या वाहनांसाठी पार्किंगची सोय कुठेच केलेली नाही. त्यामुळे ग्राहक असो, किंवा पर्यटन असो, रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करून ठेवतात. आणि मग ते रेस्टॉरंट गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस किंवा किनाऱ्यावर फिरायला जातात. यावर पंचायत स्थानिक आमदार सरकारने लक्ष देऊन या वाहतुकीच्या कोंडीवर योग्य ते नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करावी. अशी मागणी स्थानिक नागरिक संजय कोले यांनी केली आहे.
ज्या रेस्टॉरंट रिसॉर्ट ची पार्किंग व्यवस्था नसेल अशा रिसॉर्टला ही पंचायतीने कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पर्यटन हंगामात किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन घेत असतात. हे चित्र आज पर्यंत दिसत होते. परंतु आता पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणात पर्यटक किनारी भागात येऊन पर्यटनाचा पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून येते.