आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर

दिनांक: २ ऑगस्ट २०२४

बांदा : प्रतिनिधी
आधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक शाळांनाही रस्ता, जमिनीचे बक्षिसपत्र अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली.
पाडलोस येथे भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने पाडलोस मधील तिन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी हेमंत मराठे बोलत होते. व्यासपीठावर भाजप युवा मोर्चा सावंतवाडी सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य काका परब, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदा गावडे, तसेच शंकर कोरगावकर, हर्षद परब, अमोल नाईक, माजी सरपंच अमिषा पटेकर, मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी केले. आभार काका परब यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *