
दिनांक:०५/११/२०२६
मालवण:आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने सरपंचपदाच्या निर्णायक मतदानाच्या मतदानाच्या जोरावर अक्षय कदम यांनी बाजी मारत उपसरपंच म्हणून निवडून आले . धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग लेखापरीक्षक तसेच एल एल बी झालेले अभय सुकाळी यांनी अक्षय कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
