आताच शेअर करा

सिंधुदूर्ग : संपादकीय

दिनांक : २७ जुलै २०२४

वाफोली येथे पोस्ट खात्याचे डाग घेऊन जाणारा कंटेनर आज  पहाटे सुमारे ४:०० दरम्याने कलंडला सविस्तर माहिती अशी की आंबोली वरुन दाणोली मार्गे बांदयाच्या  दिशेने जाणारा कंटेनर गटाराच्या बाजूने कलंडला आहे. समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी छोट्या गाडीने वळण  काढताना कंटेनरच्या बाजूने  गाडी घातल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर गटाराच्या बाजुला   कलंडला. समोरून येणारी गाडी लहान होती. तीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला.ही गाडी बांद्यावरून आंबोलीच्या दिशेने जात होती.तामिळनाडू पासिंग ची गाडी होती.हा कंटेनर बेळगांव  वरुन गोव्याच्या दिशेने जात होता. गाडी गटारात गेली नसती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती म्हणून गटाराच्या दिशेनं जास्त स्टिअरिंग फिरवल्याने गाडी गटारात कलंडली कंटेनरच्या वाहन चालक सादिक पठाण याने ही माहिती दिली. कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण गाडीचे नुकसान झाले आहे.ह्या वळणाच्या दरम्याने बांद्याच्या दिशेनं एक महिन्या  पूर्वी गतिरोधक घातला होता. तो  उखडला आहे.त्यामूळे समोरून पुन्हा भरधाव वेगाने गाड्या येण्यास सुरवात झाली आहे. हया वळणावर गतीरोधका पूर्वी दिवसाला एक अपघात असे  चक्र चालु  होते. पुन्हा  गतिरोधक उकडल्याने रोज अपघात होण्याची शंका दर्शवली जात आहे. तसेच अंबोलीच्या बाजूने येणाऱ्या गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी कोणताही गतिरोध घातलेला नाही.हे सर्वात मोठे वेडेवाकडे वळण असून गाड्या येताना  व जाताना दोन्हीं बाजूच्या वाहन चालकांना समोरून येणारी गाडी दिसून येत नाही. त्यामूळे दोन्ही बाजुला सक्षम गतीरोधक घालण्याची गरज आहे. यांची दक्षता संबधित विभागाने घेतली पाहिजे. नाहीतर अपघात होणे चालूच रहाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *