बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: २३ जुलै २०२४
येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ क्लबला सिंधुदुर्ग झोन मधील उत्कृष्ट क्लब म्हणून गौरविण्यात आले. तसेच या क्लब ला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्लब म्हणून देखील गौरविण्यात आले. जिल्हा प्रतिनिधीच्या ५२व्या पदग्रहण समारंभात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बांदा क्लबला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बांदा युथ क्लबचे कार्य हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना माजी जिल्हा प्रतिनिधी प्रांजल मराठे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या क्लबची सचिव मिताली सावंत हिला सिंधुदुर्ग झोन मधील सर्वोत्कृष्ट सचिव म्हणुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाध्यक्ष निखिल चिंदक म्हणाले, बांदा रायझिंग युथ क्लब सुरू होऊन २ वर्षे झाली. पण या दोन वर्षात त्यांनी उत्तम कार्य करत ५० हून अधिक नवनवीन उपक्रम राबविले. भविष्यात देखील असेच वेगवेगळे उपक्रम राबवत रहा. बांदा क्लबचा हा सिंधुदुर्ग झोन मधील सलग दुसरा उत्कृष्ट क्लब चा गौरव आहे. यावेळी मंचावर माजी जिल्हाध्यक्ष प्रांजल मराठे, माजी सचिव सिद्धांत शेट्ये, माजी जिल्हा गव्हर्नर नासिर बोरसदवाला आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बांदा रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अवधूत चिंदरकर, रोहन कुबडे, अक्षय कोकाटे, शिवम गावडे, विनिता कुबडे, मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर, माजी अध्यक्ष अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर यांनी पुरस्कार स्वीकारला.