आताच शेअर करा

अमेरिकेच्या जी आय आर चे मार्गदर्शन.

शाळेतील मुलींच्या रोबोटिक्स क्लबला लेगो रोबोट भेट.

भविष्यात ग्रामीण मुलांस सातत्याने मार्गदर्शन.

गोवा : हरमल प्रतिनिधि

दिनांक:२१ जुलै २०२४


अमेरिकास्थित गर्ल्स फॉर रोबोटिक्स (जी.आय.आर) या अमेरिकन बिगर शासकीय संस्थेतर्फे केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये दोन दिवसीय स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा घेण्यात आली.

अमेरिकेच्या हायस्कुलस्थरीय रोबोटिक्स संघात अव्वल स्थान प्राप्त जी.आय.आर. रॉबोटिक्स संघाच्या कर्णधार तथा तिथल्या शाळेतील रोबोटिक्स क्लबच्या संचालिका निधी मांद्रेकर, फिलिप्स कंपनीचे उत्तर अमेरिकेचे माजी प्रमुख माहिती अधिकारी वं जी आय आरचे प्रशिक्षक दीपक मांद्रेकर आणि डॉ पल्लवी मांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा पार पडली.

शाळेतील निवडक ३३ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतलेला. रोबोट निर्मितीसाठी लागणारे जावा प्रोग्रॅमिंग, रोबोटचे डिझाइनिंग व नियोजन करून रोबोट कसे तयार करावे याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले.

दुसऱ्या दिवशी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटचे  सर्व मुला समोर प्रात्यक्षिक करून दाखविले. . यावेळी मुलांनी रोबोट प्रत्यक्ष हाताळले, तसेच आपल्या शंका चे निरसन करून घेतले.

ग्रामीण भारतातील मुलांमध्ये नैसर्गिक कुशाग्र बुद्धिमत्ता असते. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स सारखे अध्ययावत ज्ञान मिळाले तर ती भविष्यात या क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतील. याच उद्देशाने जी आय आर, अमेरिकाने केरी सारख्या गावात ही कार्यशाळा भरवली असल्याचे यावेळी दीपक मांद्रेकर यांनी सांगितले.

रोबोटिक्सला आगामी काळात मोठी मागणी आहे. आर्टिफिशल इंटिलिजन्समुळे भविष्यात सर्वच क्षेत्रात मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. माणसाला पर्याय म्हणून रोबोट्स कार्यरत होतील. तेव्हा भविष्याचे वेध घेत केरीतील ग्रामीण शाळेत रोबोटिक्सवर कार्यशाळा घेण्या मागचा हेतू असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी व्यक्त केला.

मुलींना मुलांसोबत विज्ञान तंत्रज्ञानाच्या समान संध्या उपलब्ध व्हाव्या यासाठी जी. आय. आरने शाळेच्या मुलींचा रोबोटक्स क्लब स्थापन करण्यासाठी आवाहन केले. तसेच त्यांना सातत्याने मार्गदर्शन दिले जाईल असे सांगितले. याचाच भाग म्हणून निधी मांद्रेकर यांनी शाळेला जी आय आर लेगो रोबोटिक्स किट भेट दिले. ज्याचा लाभ मुलांना रोबोटिक्स अध्ययन व स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी होईल.

त्यानंतर केरी शिक्षण संस्थेचे खजिनदार मिलिंद तळकर यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

समारोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सौरभ पेडणेकर यांनी केले. संगणक शिक्षिका स्मिता मांद्रेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *