
सिंधुदुर्ग: संपादकीय
दिनांक १७ जुलै २०२४
बांदा पानवळ येथे राहणारे महेंद्र वसंत हडफडकर वय वर्ष ५३ तालुका सावंतवाडी येथून दिनांक १६ / ७ / २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बांदा एस टी स्टँड वरून बेपत्ता झालेले आहेत सदर व्यक्ती मुका आणि बहिरा, रंग गोरा, केस काळे कुरळे, चेहरा उभट, उंची सुमारे ५ फूट, अंगात काळ्या रंगाचा रेनकोट, पायात पॅरागॉन कंपनीची चप्पल ही व्यक्ती आपल्या आई वनिता हिस बांदा येथे आपण जाऊन येतो असे खुणेने सांगून निघून गेली ती परत घरी आलीच नाही. म्हणून दिनांक १७/७/२०२४ रोजी सदर व्यक्तीच्या नातेवाईकांनी बांदा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. अशी संशयित व्यक्ती आढळल्यास बांदा पोलीस स्टेशनला संपर्क करावा. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल /८८२ एस. एस. नाईक करत आहेत.
