
सिंधुदूर्ग :संपादकीय
दिनांक : १५ जुलै २०२४
शेर्ले शेटकरवाडी येथील अनिता पालव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने पालव यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी घडली. ही माहिती शेर्लेचे माजी सरपंच उदय धुरी यांनी दिली.
बांदा परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेर्ले येथील पालव यांच्या घरानजीक असलेले भलेमोठे फणसाचे झाड पालव यांच्या घरावर कोसळले. यामध्ये घराच्या छपराचे तसेच व घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक रहिवाशी लवू सावंत, राम आमडोसकर, माजी सरपंच उदय धुरी, शाम सावंत, चंद्रशेखर धुरी, दिपक गोवेकर, एकनाथ मेस्त्री, अंकुश तारी, उदय पिंगुलकर, वसंत वाघाटे, अरुण खडीयेकर, आना धुरी , राजू परब दयानंद धुरी, गौरेश जाधव तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरु होते.


