बांदा प्रतिनिधी संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: १८ जुलै २०२४
बांदा विठ्ठल मंदिर येथील आषाढी एकादशी उत्सवासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे आर्थिक देणगी देण्यात आली. याबाबतची माहिती भाऊ वाळके यांनी दिली.
यावेळी मंदिराच्या वतीने ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन यांनी देणगी स्वीकारली. यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना पांगम, सुशांत पांगम, भाऊ वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, प्रथमेश गोवेकर, प्रीतम हरमलकर, अभय सातार्डेकर, नितीन वाळके, राजेश पावसकर आदी उपस्थित होते.