दिनांक: ०५/१०/२०२६

न्हावेली: दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी तालुक्यात न्हावेली गावामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी अडविणे तसेच पाण्याची साठवण करणे भूजल पातळी वाढ करणे या उद्देशाने गावातील ग्रामस्थांनी भटाचेटेंब बंधारा व चौकेकरवाडी आवळेभोम बंधारा दोन्ही बंधाऱ्याला फळ्या टाकून पाणी अडवण्याचे काम केले काम चालू असताना सावंतवाडी तालुक्याचे सभापती जाधव मॅडम तसेच बीडीओ जाधव आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून कामाची पाहणी केली त्याप्रसंगी मा .सरपंच श्री.अष्टविनायक धाऊसकर व ग्रामपंचायत समिती उपस्थित होती. झालेल्या कामात गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले विशेषतः मा. पंचायत समिती सदस्य श्री.शरदजी धाऊसकर यांच्या देखरेखी खाली दोन्ही बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले
