
दिनांक: १६/०८/२०२६
सावंतवाडी :शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर १८ ऑगस्ट २०२६ रोजी नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळ, युवा रक्तदाता संघटना तसेच शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी पंखे वाटप करण्यात येणार आहे.
याचबरोबर सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यांमध्ये सुमारे ५००० वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तसेच सावंतवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप, तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.तर गरजू नागरिकांना छत्री वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर तसेच कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास शिवसेना महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, सर्व सरपंच व उपसरपंच विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख,शाखाप्रमुख तसेच शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विविध सामाजिक उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक सेवेची जोड मिळणार असून, समाजोपयोगी कार्याचा संदेश देण्यात येणार आहे.
