आताच शेअर करा

दिनांक: २६/०७/२०२६

सावंतवाडी:पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात  उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सावंतवाडीतील जोवेल ड्युमिंग डिसिल्वा यांना पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे सह्याद्रीचे शिलेदार राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.पर्यावरणाचे रक्षण आणि समाजाचे सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान हे उल्खनीय असल्याने त्याची पहाट फाउंडेशन ने दखल घेऊन त्यांच्या समितीने डिसिल्वा यांची  मान सन्मानासाठी या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार सोहळा वितरण ८ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराने डिसिल्वा यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचे मित्रपरिवार नातेवाहिक आणि सावंतवाडी शहरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *