
दिनांक: २६/०७/२०२६
दोडामार्ग: श्री. विजय लाडू जाधव रा. कुडासे ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग हे गेल्या ७-८ वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. गेली अनेक वर्षे ते डायलिसिसवर असून, प्रचंड वेदना आणि त्रास सहन करत आहेत. सध्या त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज (GMC), बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असून, त्यासाठी योग्य दात्याची नितांत गरज आहे.
आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, जर आपल्यापैकी कोणी किडनी दान करण्यास इच्छुक असेल किंवा आपल्या ओळखीत कोणी योग्य दाता असेल, तर कृपया संपर्क साधावा. आपली थोडीशी मदतही विजय जी यांच्या आयुष्यासाठी खूप मोलाची ठरू शकते.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया हा संदेश शेअर करा. आपले सहकार्य आणि प्रार्थना या कठीण काळात खूप महत्त्वाच्या आहेत.
संपर्क: 76660 13188
9284146364
