दिनांक: २४/१०/२०२६

बांदा: शेतकरी जागृत होत आहेत आणि संघटनांच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयातील त्रुटी दाखवून पुन्हा फेर रचना करण्यास भाग पाडत आहेत असा अनुभव महाराष्ट्रभर येत आहे .कारण कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्यात आला आहे .सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाने याबाबत प्रथम शासनाचे लक्ष वेधले आणि महाराष्ट्र भरातील शेतकरी संघटनांनी एकमुखी आवाज उठवून कृषी आकृतीबंध फेररचनेबद्दल आग्रही मागणी केली .मंगळवार 22 सप्टेंबर 2026 रोजी मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होऊन कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून 2009 चा मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम राहणार असून सुधारित आकृतीबंधाचा फेर प्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाच्या कार्य भाराचा ,उपलब्ध मनुष्यबळाचा,रिक्त पदांचा,विविध संवर्गाच्या आवश्यकता,क्षेत्रीय यंत्रणेची गरज,शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसेच भविष्यातील प्रशासकीय गरजा यांचा सर्व कष आढावा घेण्याचा आदेश कृषी विभागाला देण्यात आल्याने सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहे. . . .जशी शाळा वाचवा -शिक्षण वाचवा ची पहिली हाक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आठ ते नऊ हजार शिक्षण प्रेमीनी एकत्र येऊन दिली आणि त्याचा वणवा महाराष्ट्रभर पसरून सरकारला शैक्षणिक धोरणे बदलावी लागली तोच प्रकार नवीन कृषी आकृतीबंधाबद्दल घडला . . . .नवीन कृषी आकृती बंधात शेतकऱ्याच्या शेतावर बांधावर जाणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांच्या जागा कमी करून कार्यालयीन स्टाफ वाढविला .त्यामुळे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन व सहाय्य करणाऱ्या कृषी सहाय्यकांची संख्या कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता . . ..शासनाने शेतावर जाऊन मार्गदर्शन करणाऱ्या कृषी सहाय्यकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे शिवाय मंडळ कार्यालय ही वाढविणे आवश्यक आहे .शेतकऱ्यांचा कारभार तालुक्यातून चालविणे शहाणपणाच नाही .वर्षातून एखाद दुसऱ्या वेळी काम असणारी तलाठी -मंडळ कार्यालय एक वेळ बंद झाली तरी चालतील शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन काम करू शकेल पण कृषी कार्यालयांची संख्या व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे . . . .शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला एक कृषी सहाय्यक देणे आवश्यक आहे . 56 महसुली गाव असणाऱ्या दोडामार्ग तालुक्यात 7 कृषी अधिकारी तर शेती बागायती मध्ये प्रगतशील असणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील 85 महसुली गावात 28 कृषी सहाय्यक हे अन्यायकारक आहे .शासनाने नवीन कृषी आकृतीबंधात शेतावर बांधावर जाणाऱ्या कृषी सहाय्यकांची संख्या वाढवावी .43 हजार 500 हून अधिक गावी असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त 11 445 कृषी सहाय्यक अधिकारी हे कृषी प्रगत महाराष्ट्राला शोभणारे नाही .अशातच 20 सप्टेंबर 2026 पर्यंत 2138 . 4 मिलिमीटर पाऊस पडला असून गेल्या वर्षी याच कालावधीत 3609 मिलिमीटर पाऊस पडला होता .एकूण 1470 मिलिमीटर पावसाची तूट झाली असून दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली असताना कृषी सहायकांची प्रचंड आवश्यकता आहे .कृषी आकृतीबंध फेर रचनेच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून कृषी सहाय्यकांची व मंडळ कार्यालयांची संख्या वाढवावी अशी मागणी सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी केली आहे .
